नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने कालच्या टी-२० सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या सामन्यात ४ ओव्हरमध्ये त्याने २९ रन्स दिले. पण विकेट घेऊ शकला नाही.
मात्र तरीही त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. हार्दिक पंड्याने जर कॅच सोडली नसती तर एक विकेट त्याच्या नावावर झाली असती.
फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात आशिष नेहराने एन्डवरून गोलंदाजी सुरू केली. क्रिकेटच्या दुनियेत असे करणारा तो दुसरा खेळाडू आहे. आशिषच्याआधी इंग्लंडचा खेळाडू जेम्स अॅंडरसन याला तो सन्मान मिळाला आहे.
How's that for footy skills from our very own Nehraji? What do you make of that @YUVSTRONG12 #INDvNZ pic.twitter.com/YaTeJk5d0t
— BCCI (@BCCI) November 1, 2017
आपल्या करिअरच्या शेवटच्या सामन्यातही आशिष नेहराने गोलंदाजीसोबतच शानदार फिल्डींग करिश्मा दाखवला. या सामन्यात युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. बॉल बॅट्समनच्या बॅटला लागून बाऊंड्रीकडे गेला. पण आशिष नेहराने ज्या पद्धतीने बॉल अडवला ते पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा हैराण झाला.
आशिष नेहराने पायाने बॉल थांबवला, बॉल वर उसळला, नेहराने हवेतील बॉल पकडला आणि थ्रो फेकला. टीमच्या सर्वच खेळाडूंनी त्याचं कौतुक केलं. पण नेहराला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. मात्र नेहराला ज्याप्रकारचं फेअरवेल मिळालं त्याने त्याचं विकेट न मिळण्याचं दु:खं नक्कीच कमी झालं असेल. सचिननंतर नेहरा दुसरा खेळाडू आहे. ज्याला आपल्या होमग्राऊंडवर निवॄत्तीची संधी मिळाली. नेहराला त्याच्या साथीदारांनी खांद्यावर घेऊन फिरवले.