close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : फीफा वर्ल्ड कपमध्ये फॅनची महिला पत्रकाराला लाइव्ह शोमध्ये KISS

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ

VIDEO : फीफा वर्ल्ड कपमध्ये फॅनची महिला पत्रकाराला लाइव्ह शोमध्ये KISS

मुंबई : फीफा वर्ल्ड कपची माहिती देणाऱ्या महिला पत्रकाराला एका चाहत्याने भर लाइव्ह कार्यक्रमात किस केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कोलंबियन कोरपोंडेंट जूलिथ गोंजालेज थॅरन डच वॅलेकरता काम करत आहे. ही न्यूज एजन्सी रूसमध्ये काम करत आङे. लाईव्ह शो दरम्यान एक फिफाचा चाहता आला आणि त्याने महिला पत्रकार जूलिथच्या गालांवर किस केलं. जूलिथने बातमी देताना काहीही प्रतिक्रिया न देता आपलं काम केलं. पण त्यानंतर तिने सोशल मीडियावर याची प्रतिक्रिया दिली. 

विश्व कपची माहिती देताना जर्मन टीव्हीच्या एका पत्रकाराला पकडून चुंबन घेणाऱ्या रुसी फुटबॉलप्रेमीने माफी मागितली आहे. एका व्हिडिओ कॉलमध्ये त्या व्यक्तीने पत्रकाराची माहिती मागितली. मी मनापासून तुमची माफी मांगतो. मी खूप गैरवर्तणूक केली असून मी विचार केला नाही की तुम्हाला याचा किती त्रास झाला असेल. 

जूलिथ गोंजालेजने या घटनेबाबत लिहिताना म्हटलं आहे की, आम्ही यासारख्या प्रकारांची आशा करत नाही. आम्ही खूप प्रोफेशनल आहोत. त्यामुळे आमच्यासोबत अशा प्रकारे व्यवहार करू नका.