close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फक्त १.१० सेकंदामुळे राहुलला मोडता आलं नाही विराटचं रेकॉर्ड

इंग्लंड दौऱ्यामध्ये ओव्हल टेस्टच्या कठीण परिस्थितीमध्ये लोकेश राहुलनं १४९ रनची शानदार खेळी केली.

Updated: Oct 9, 2018, 06:59 PM IST
फक्त १.१० सेकंदामुळे राहुलला मोडता आलं नाही विराटचं रेकॉर्ड

मुंबई : इंग्लंड दौऱ्यामध्ये ओव्हल टेस्टच्या कठीण परिस्थितीमध्ये लोकेश राहुलनं १४९ रनची शानदार खेळी केली. इंग्लंडमधल्या पहिल्या ४ टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पाचव्या टेस्टमध्ये राहुलला सूर गवसला. आदिल रशीदच्या जबरदस्त बॉलवर राहुल आऊट झाला, पण त्याची ही खेळी कायमच क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहिलं. भारताचा हा ओपनिंग बॅट्समन त्याच्या फिटनेससाठी कायमच आग्रही असतो. याचे व्हिडिओही राहुल इन्स्टाग्रामवर शेअर करतो.

नुकताच लोकेश राहुलनं ३ रन धावतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राहुलनं हे ३ रन १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले. याआधी विराट कोहलीनं हे चॅलेंज घेतलं होतं. पण विराटनं ८.९० सेकंदांमध्ये ३ रन पूर्ण केले होते. त्यामुळे १.१० सेकंदामुळे राहुलला विराटचं हे रेकॉर्ड मोडता आलं नाही. विराट आणि राहुल पायाला पॅड बांधून आणि हातात बॅट घेऊन धावले.