माय-लेकाचा गळाभेटीचा व्हिडीओ पाहून सारं फुटबॉल विश्व भावूक, पाहा Video

पोराने स्वत:चंच नाहीतर जगाचं स्वप्न पूर्ण केलं, आईनेही तिच्या वाघाला कडकडून मारली मिठी!

Updated: Dec 19, 2022, 06:52 PM IST
माय-लेकाचा गळाभेटीचा व्हिडीओ पाहून सारं फुटबॉल विश्व भावूक, पाहा Video   title=

Lionel Messi hugging his mother : अर्जेंटिना आणि फ्रान्समधील झालेला फायनल सामन्याकडे जगाचं लक्ष लागून होतं. (Argentina vs France Fifa final 2022) फिफा 2022 चा अंतिम सामना डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये पेनल्टी शूट-आऊटमध्ये अर्जेंटिनाने विजय मिळवला. (Argentina winner Fifa Final 2022) गल्लीपासून दिल्लीपर्यंत अर्जेंटिनाच्या विजयाचा मेस्सीचं स्वप्न पूर्ण झाल्याचा जल्लोष केला जात आहे. अशातच सोशल मीडियावर मेस्सीच्या आईचा त्याचा गळाभेटीचा व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे. (Lionel Messi hugging his mothe viral video lates marathi sport news)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की अर्जेंटिनाच्या विजयानंतर लिओनल मेस्सीची आई मैदानात धावत आली. मेस्सी पुढे चालला होता तितक्यात त्या मागून आल्या मेस्सीने पाहिलं कोण त्यानंतर आईला पाहताच दोघांनी कडकडून मिठी मारली. त्या क्षणी मेस्सीची आई भावूक झालेली दिसली. माय लेकाच्या गळाभेटीचा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले.  

पाहा व्हिडीओ-

फायनल सामना-
अर्जेंटिनाकडून सामन्याच्या 23 व्या मिनिटाल मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर डी मारियाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला होता. पहिल्या हाल्पमध्ये अर्जेंटिनाकडे आघाडी होती. सामना पूर्णपणे अर्जेंटिनाच्या पारड्यात झुकला होता. दुसऱ्या हाल्फच्या शेवटाला पेनल्टी मिळाल्यावर फ्रान्सच्या एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पहिला आणि 81 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली. 

90 मिनिटांमध्ये सामना  2-2 च्या बरोबरीत सुटला, त्यानंतर 30 मिनिटांचा एक्सट्रा टाईम देण्यात आला. मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आणि 108 व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात आघाडी घेतली. सर्व हताश झाले होते कारण सामना जवळपास फ्रान्सने जिंकला होता मात्र तितक्यात हँड झाला आणि एम्बाप्पेने तिसरा गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला.