Video : पाकिस्तानचा छोटा 'शेन वॉर्न', फिरकीचे फॅन वसीम आणि शोएब

क्रिकेटच्या जगात पाकिस्तान नेहमी गोलंदाजांची खाण म्हणून पाहिले जाते. या देशाने क्रिकेटला एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज दिले आहेत. सरफराज नवाज असो वा इमरान खान किंवा वसीम अक्रम किंवा वकार युनूस... जलद गती गोलंदाजांसोबत स्पिनमध्ये अब्दुल कादीर आणि सकलेन मुस्ताक हे कुठे मागे नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी वसीम अक्रमने एका छोट्या मुलांचा व्हिडिओ शेअर केला होता. यात एक मुलगा जलद गोलंदाजी करताना दिसत आहे. असा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक छोटा मुलगा स्पिन गोलंदाजी टाकत आहे. पण त्याचे चेंडू ज्या पद्धतीने स्पिन होताहेत. ते पाहून लोकं तोंडात बोटं घालत आहेत.

Updated: Mar 26, 2018, 06:26 PM IST
Video :  पाकिस्तानचा छोटा 'शेन वॉर्न', फिरकीचे फॅन वसीम आणि शोएब  title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या जगात पाकिस्तान नेहमी गोलंदाजांची खाण म्हणून पाहिले जाते. या देशाने क्रिकेटला एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज दिले आहेत. सरफराज नवाज असो वा इमरान खान किंवा वसीम अक्रम किंवा वकार युनूस... जलद गती गोलंदाजांसोबत स्पिनमध्ये अब्दुल कादीर आणि सकलेन मुस्ताक हे कुठे मागे नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी वसीम अक्रमने एका छोट्या मुलांचा व्हिडिओ शेअर केला होता. यात एक मुलगा जलद गोलंदाजी करताना दिसत आहे. असा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक छोटा मुलगा स्पिन गोलंदाजी टाकत आहे. पण त्याचे चेंडू ज्या पद्धतीने स्पिन होताहेत. ते पाहून लोकं तोंडात बोटं घालत आहेत.

हा व्हिडिओ पाकिस्तानच्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा छोटा खेळाडू सिमेंटच्या पिचवर बॉल फिरविण्याची किमया करून दाखवत आहे. त्याला पाकिस्तानचा शेन वॉर्न म्हणून ओळखले जात आहे. शेन वॉर्नने माइक गेटिंग याला ज्या चेंडूवर बाद केले होते. असे अनेक चेंडू हा चिमुकला टाकू शकतो. 

 

६ वर्षांचा हा खेळाडू पाकिस्तानच्या क्वेटा येथील आहे. असे म्हटले जाते की अली मिकाल खान नावाच्या या लेग स्पिनची भेट नुकतीच शेन वॉर्नशी झाली होती. वॉर्न त्याच्या गोलंदाजीने अत्यंत प्रभावित झाला होता. त्याने त्याची प्रशंसाही केली होती. या व्हिडिओला आतापर्यंत ट्विटरवर ५१ हजार लोकांनी पाहिले आहे. 

यापूर्वीचा व्हिडिओ 

 

फैजान रमजानच्या नावाने एक ट्विटर यूजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि रमीज राजाला याला टॅग केला आहे. व्हिडिओ शेअर करताना फैजान म्हटले की, मला आता हा व्हिडिओ मिळाला आहे. मला नाही माहिती हा कोण मुलगा आहे, या मुलाच्या शानदार गोलंदाजीबाबत आपले विचार जाणून इच्छितो. 

शेन वॉर्नने माइक गेंटिंगला फेकलेला एक चेंडूला बॉल ऑफ सेंच्युरी म्हटले जाते. या बॉल लेग स्टंपवर पडून गेटिंगचा ऑफ स्टंप घेऊन गेला होता. असा टर्न पाहून माईक गेटिंग आणि अंपायर अचंबित झाले होते.