VIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही!

Vinod Kambli Viral Video: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 5, 2024, 07:27 PM IST
VIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही! title=

Vinod Kambli Viral Video: कधीकाळी आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना कुटणाऱ्या विनोद कांबळी याची अवस्था दयनीय झाल्याचं दिसून येतंय. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांना नीट चालता येत नाहीये. 

विनोद कांबळी यांचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद कांबळी याला योग्य पद्धतीने उभं देखील राहता येत नाहीये. यावेळी उभं राहण्यासाठी त्याला बाईकचा आधार घ्यावा लागतोय. यावेळी जेव्हा तो चालायचा प्रयत्न करतो त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांना त्याला आधार दिला आणि उचलून त्यांना बाजूला नेलं. दरम्यान कांबळीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकं विविध कमेंट्स करतायत. 

विनोद कांबळीला नेमकं काय झालं?

दरम्यान या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी याला नेमकं काय झालं आहे, हे अजून समजू शकलेलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्समुसार, विनोद कांबळी यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती होती. यापूर्वी देखील अनेक कारणांमुळे त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. त्याला हार्ट अटॅकचा त्रास असून तो डिप्रेशनमध्ये असल्याचंही म्हटलं जात होतं. 

सचिनच्या मदतीने मिळालेली नोकरी

काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी आर्थिक संकटात देखील सापडला होता. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुढाकार घेत त्याला मदत केली होती. सचिनने त्याची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय तो मुंबई टी-20 लीगमध्ये टीमचा प्रशिक्षकही झाला. मात्र यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली.

कसं आहे विनोद कांबळीचं करियर

विनोद कांबळीने भारतासाठी 17 टेस्ट सामने खेळले असून 104 वनडे सामन्यांमध्ये त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. कांबळीने टेस्ट क्रिकेटमध्ये 54.20 च्या सरासरीने 1084 रन्स केले. यावेळी वनडे क्रिकेटमध्ये 32 पेक्षा जास्त सरासरीने 2477 रन्स केल्या. इतकी चांगली आकडेवारी असूनही या खेळाडूची कारकीर्द खूप लवकर संपली.