Vinod Kambli Video Viral Sachin Tendulkar Urged: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आहे. एकेकाळी गोलंदाज ज्याच्या समोर उभं राहायला घाबरायचे त्याच विनोद कांबळीला आज स्वत:च्या पायावर उभं राहता येत नसल्याचं धक्कादायक वास्तव या व्हिडीओमधून समोर आलं असून व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. काय होतास तू काय झालास तू म्हणावं अशी कांबळीने स्वत:ची अवस्था करुन घेतली आहे. या व्हिडीओमध्ये वीनोद कांबळीला साधं स्वत:च्या पायावर उभंही राहता येत नाहीये. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता विनोद कांबळीचा जीवलग मित्र असलेला सचिन तेंडुलकर त्याच्या मदतीला येणार का? अशी चर्चा सुरु असतानाच अनेक चाहत्यांनी सचिननेच आता आपल्या मित्रासाठी पुन्हा उभं राहिलं पाहिजे अशी गळ घातली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी दुचाकीला कीक मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र खरं तर त्याला साधं त्याच्या पायांवर उभंही राहता येत नाहीय. उभं राहण्यासाठी त्याला बाईकचा आधार घ्यावा लागत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. बाईक सोडून तो चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा चार पावलंही आधाराशिवाय चालता येत नाही. आजूबाजूला असलेल्या लोकांचा आधार घेत तो चालायचा प्रयत्न करतो. मात्र शेवटी लोक त्याला उचलून बाजूला नेतात.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये विनोद कांबळीला नेमकं काय झालं आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्समुसार, विनोद कांबळीला प्रकृतीसंदर्भात समस्या आहेत. यापूर्वी देखील वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. विनोद कांबळीला हृदयासंदर्भातील काही समस्या आहेत. आता त्याचा हा व्हिडीओ पुढे आल्यानंतर अनेकांनी सचिनकडे त्याला मदत करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच पाहा चाहत्यांनी सचिनला कांबळीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय म्हटलं आहे.
1)
Really feel sorry for our Vinod Kambli. @sachin_rt
Need help here. pic.twitter.com/d8E4jYklFe— Vinod Authentic Hindu (@Vinod__71) August 5, 2024
2)
Master Blaster… please help https://t.co/W6ZJYF8XpR
— Nihari Korma (@NihariVsKorma) August 6, 2024
3)
Sad look at Vinod Kambli’s condition He was once among best batters/fielders in cricket team Bad luck/lifestyle is the apparent cause of his present state of health His pal 'Bharat Ratna' Sachin Tendulkar & BCCI shd help in his best possible rehabilitation fast pic.twitter.com/ZVSC2fpeTl
— G M A PRABHU (@GMAPRAPRABHU1) August 5, 2024
4)
Your friend Vinod Kambli is very ill. Forgot all the issues and help him. No option only sending obituaries
— Discount Adda (@Opinions1789) August 5, 2024
दरम्यान, सचिनने यापूर्वी अनेकदा विनोद कांबळीला मदत केली आहे. काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी आर्थिक संकटात होता त्यावेळी सचिन तेंडुलकरने पुढाकार घेत त्याला मदत केली होती. सचिनच्या माध्यमातून विनोद कांबळीला एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. तसेच तो मुंबई टी-20 लीगमध्ये एका संघाचा प्रशिक्षकही झाला होता. मात्र पुन्हा त्याची प्रकृती खालावल्याने त्याला ही प्रशिक्षकपदाची नोकरी सोडावी लागली होती. आता पुन्हा सचिन विनोद कांबळीला मदत करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होऊ शकेल.