वामिकाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल

वामिकाच्या वाढदिवसाचे ऋद्धिमान साहाच्या पत्नीनं शेअर केले फोटो, पाहा कसा साजरा झाला वाढदिवस

Updated: Jan 12, 2022, 06:01 PM IST
वामिकाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल title=

मुंबई: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. याच दरम्यान वामिकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वामिकाला 1 वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात एकदाही विराट आणि अनुष्काने वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवला नाही. तरीसुद्धा त्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काने वामिकाच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र नंतर ते डिलीट केले. आता विकेटकीपर ऋद्धिमान साहाच्या पत्नीने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

चाहत्यांच्या नजरा मात्र वामिकावर आहेत. फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसतो का याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे. मात्र यावेळी देखील काहीसा हिरमोडच झाला. वामिकाचा चेहरा अजूनही समोर येऊ शकला नाही. वामिकाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात दक्षिण आफ्रिकेत साजरा करण्यात आला आहे. 

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका केपटाऊनमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. याआधी दोन्ही संघानी प्रत्येकी एक समाना जिंकून बरोबरी केली आहे. त्यामुळे आता तिसरा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.