WTC Final 2023 IND vs AUS : नुकतंच टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( World Test Championship 2021-23 Final ) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाला ( Team India ) 209 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान यानंतर भारतीय चाहते फार निराश झाले. दरम्यान चाहत्यांसोबत खेळाडूही काहीसे नाराज होते. अशामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करतोय. यामध्येच आता विराट डिप्रेशनमध्ये ( Virat Depression ) तर गेला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.
विराट कोहलीचे स्टेटस आणि स्टोरी चर्चेचा विषय ठरली होती. अशातच विराटचा भाऊ विकास कोहलीने ( Vikas Kohli ) विराटबाबत एक मोठं विधान केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली ( Virat Kohli ) ज्या प्रकारचे पोस्ट शेअर करतोय, ते काहीसे डिप्रेस असल्याच्या चर्चा आहेत. त्याच्या या स्टोरी पाहून चाहते देखील हैराण होते. दरम्यान यामागे नेमकं काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अशातच विकास कोहलीने यााबाबत माहिती दिलीये.
क्रिकटॅकर या बेवसाईटने याबाबत बातमी दिली आहे. त्यांच्या बातमीत नमूद केल्यानुसार, विकास कोहली म्हणाला की, विराट आजकाल आमच्याशी बोलत नाहीये. तो त्याच्या खोलीमध्येही एकटाच राहतोय. आम्हाला नाही माहिती की तो डिप्रेशनमध्ये आहे की कोणत्या एका गोष्टीने नाराज आहे. मात्र आम्ही आशा करतोय की, तो लवकर ठीक व्हावा.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( World Test Championship 2021-23 Final ) फायनल सामना भारताने दुसऱ्यांदा गमावला. यंदाच्या सामन्यात त्याचा परफॉर्मन्स काहीसा खास दिसून आला आहे. पहिल्या डावात 14 तर दुसऱ्या डावात 49 रन्स करून विराट आऊट झाला. यावेळी चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्यामध्ये विराट फेल गेला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 रन्सने विजय मिळवलाय. टीम इंडियाच्या पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमला 173 रन्सची मजबूत आघाडी मिळाली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने दुसऱ्या डावामधये 270 रन्स करत टीम इंडियाला जिंकण्यासाठी 443 रन्सचं टार्गेट दिलं होतं. दुसऱ्या डावात देखील टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी पाचव्या दिवशी कांगारूंना सामना जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज होती. अखेर 234 रन्सवर संपूर्ण टीम इंडियाचा डाव आटोपला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.