मुंबई : लव्हस्टोरी कधी, कुठे जन्म घेतील हे काही आपण सांगू शकत नाही. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची प्रेमकहाणी ही काही अगदी
"लव्ह अॅट फस्ट साईट" अशी अजिबात नव्हती. खरं तर हे प्रेम हळू हळू फुलतं गेलं. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांची पहिली ओळख ही एका शूटवेळी झाली होती. मात्र त्या एका जाहिरातीने दोघांचं आयुष्य बदललं. रील लाईफमधली ही जोडी रिअल लाईफपर्यंत कधी येऊन पोहोचली कळलं देखील नाही. महत्वाची बाब म्हणजे या दोघांची स्टोरी ही प्रेक्षकांसाठी खास होती. सर्वांनीच या जोडीला भरपूर पसंत केलं आहे.
Today we have promised each other to be bound in love forever. We are truly blessed to share the news with you. This beautiful day will be made more special with the love and support of our family of fans & well wishers. Thank you for being such an important part of our journey. pic.twitter.com/Scobdiqk7l
— Anushka Sharma (@AnushkaSharma) December 11, 2017
Today we have promised each other to be bound in love for ever. We are truly blessed to share the news with you.This beautiful day will be made more special with the love and support of our family of fans & well wishers. Thank you for being such an important part of our journey. pic.twitter.com/aobTUwMNAK
— Virat Kohli (@imVkohli) December 11, 2017
१) २०१३ मध्ये कोहली आणि अनुष्का एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी भेटले. या जाहिरातीत पहिल्यांदा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. एका मुलाखतीत विराटने सांगितलं की अनुष्काला त्यावेळी समोर पाहणं हे एका स्वप्नासारखंच होतं.
२) जानेवारी २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा अगदी कठीण दौरा संपवून विराट सरळ मुंबईतील अनुष्काच्या घरी गेला. यावेळी हे दोघे एकमेकांच्या भरपूर जवळ आले. एप्रिल २०१४ मध्ये बॉम्बे व्हेलवेट आणि पीकेच्या शूटिंग दरम्यान कोहली सेटवर पोहोचला होता. त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
३) ऑक्टोबर २०१४ मध्ये या दोघांमधील प्रेम हळू हळू वाढत गेलं. ऑक्टोबरमध्ये दोघेही इंडियन सुपर लीग सामन्यात एकमेकांसोबत दिसले. श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात कोहलीने अनुष्काला फ्लाईंग किस दिलं. डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मायकल स्लेटरने चुकून अनुष्काला विराटची पत्नी समजला.
४) मार्च २०१५ मध्ये कोहलीने NH10 मध्ये अनुष्काचं कौतुक केलं. हा सिनेमा अनुष्काने प्रोड्यूस केला होता.
५) फेब्रुवरी २०१६ मध्ये दोघांमध्ये प्रेम वाढत गेलं. फेब्रुवारी २०१६ मध्ये ही अफवाह उडाली की दोघांमध्ये ब्रेकअप झालं. अनुष्का कायम या गोष्टीमुले सोशल मीडियावर ट्रोल झाली. विराट पिचवर रन बनवत होता. जून २०१६ मध्ये ट्विटरवर कोहलीने त्या लोकांना फटकारलं. त्याच्या खराब कामगिरीसाठी अनुष्काला कारणीभूत ठरवलं जातं होतं.
६) नोव्हेंबर २०१६ मध्ये गोव्यात दोघेही युवराज सिंहच्या लग्नात दिसले. डिसेंबर २०१६ मध्ये विराट आणि अनुष्काने न्यूयॉर्कमध्ये एकत्र सुट्या साजऱ्या केल्या.
७) २०१७ मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात अनुष्का विराटला भेटायला गेली. चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर विराट देखील अनुष्काला भेटायला न्यूयॉर्कला गेला.
८) ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन्ही वेडिंग ड्रेसच्या एका जाहिरातीत दिसले. यानी शॅम्पूच्या जाहिरातीत देखील एकत्र होते.
९) त्यानंतर आता लग्ना अगोदर नोव्हेंबर २०१७ मध्ये इंडियन स्पोर्ट्स अवॉर्डमध्ये दोघेही दिसले. नोव्हेंबर २०१७ मध्ये जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दोघेही भरपूर नाचले.