Virat Kohli ने रचला इतिहास; डबल सेंच्युरी केल्यानंतर शेअर केला स्पेशल व्हिडीओ

भारतीय टीमचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक कारनामे केलेत.

Updated: Jun 8, 2022, 07:59 AM IST
Virat Kohli ने रचला इतिहास; डबल सेंच्युरी केल्यानंतर शेअर केला स्पेशल व्हिडीओ title=

मुंबई : भारतीय टीमचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक कारनामे केलेत. फलंदाजीमध्ये असे फार कमी विक्रम आहेत जे विराटच्या नावावर नाहीत. मैदानावर जितका विराटचा दबदबा आहे तितकाच सोशल मीडियावरही आहे. नुकतच विराटने इंस्टाग्रामवर एक नवा विक्रम केला आहे.

इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराट कोहलीच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. कोहलीने या बाबतीत नवा विक्रम केला आहे. 200 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

जगभरातील सर्व क्रीडा दिग्गजांच्या फॉलोअर्सची यादी पाहिली तर कोहली यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर जगभरात सर्वाधिक फॉलो केलं जाणारा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. रोनाल्डोचे 451 मिलियन (45.1 कोटी) आणि मेस्सीचे 334 मिलियन (33.4 दशलक्ष) चाहते आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

सर्वाधिक फॉलो केले जाणारे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज

क्रिस्टियानो रोनाल्डो  - 451 मिलियन
लियोनेल मेस्सी  - 334 मिलियन
विराट कोहली  - 200 मिलियन
नेमान जूनियर  - 175 मिलियन
लेब्रॉन जेम्स    -  123 मिलियन

खराब कामगिरी आणि सातत्यपूर्ण क्रिकेटमुळे भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली विश्रांती घेणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील टी-20 मालिकेमध्ये तो खेळणार नाहीये. क्रिकेटच्या मैदानातून छोटा ब्रेक घेऊनही चाहत्यांमध्ये कोहलीची क्रेझ कमी झालेली नाही.