विराटने मोडला गांगुलीचा विक्रम

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५९ रननी विजय झाला.

Updated: Aug 12, 2019, 04:58 PM IST
विराटने मोडला गांगुलीचा विक्रम title=

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५९ रननी विजय झाला. या मॅचमध्ये विराट कोहलीने त्याचं ४२वं शतक पूर्ण केलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये २७९ रन केल्या. विराटने १२० रनची खेळी करत अनेक रेकॉर्डना गवसणी घातली. १२५ बॉलमध्ये केलेल्या या खेळीत १४ फोर आणि एक सिक्सचा समावेश होता.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या य मॅचमध्ये ७८ रन करून विराटने सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं. गांगुलीने ३११ वनडे मॅचच्या ३०० इनिंगमध्ये ११,३६३ रन केले, तर कोहलीने फक्त २३८ वनडे मॅचच्या २२९ इनिंगमध्ये ११,४०६ रनचा टप्पा गाठला. भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या सचिनने ४६३ मॅचच्या ४५१ इनिंगमध्ये १८,४२६ रन केल्या.

वनडेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा (१४,२३४ रन) दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (१३,७०४ रन) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीतही ४९ शतकांसह सचिन पहिल्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वनडेमध्ये विराटने जावेद मियांदादचा २६ वर्ष जुना विक्रमही मोडित काढला. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे. मियांदादने वेस्ट इंडिजविरुद्ध १९३० रन केले होते. या इनिंगमध्ये १९ रन करताच विराटने मियांदादला मागे टाकलं.