रिकी पॉटिंगच्या त्या रेकॉर्डपासून विराट एक पाऊल दूर

श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट टीम इंडियानं इनिंग आणि ५३ रन्सची जिंकली.

Updated: Aug 7, 2017, 05:02 PM IST
रिकी पॉटिंगच्या त्या रेकॉर्डपासून विराट एक पाऊल दूर  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट टीम इंडियानं इनिंग आणि ५३ रन्सची जिंकली. या विजयाबरोबरच टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर विराट कोहलीनं स्टीव्ह वॉचं रेकॉर्ड तोडलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्तावत टीम इंडियानं लागोपाठ आठ टेस्ट सीरिज जिंकल्या आहेत. विराट कोहलीच्या पुढे आता फक्त ऑस्ट्रेलियाचाच माजी कॅप्टन रिकी पॉटिंग आहे. पॉटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं लागोपाठ ९ टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या.

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया शेवटची सीरिज २०१४-१५मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच हरली होती. या अडीच वर्षांमध्ये विराटनं २८ टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यातल्या १८ टेस्टमध्ये विजय तर तीन पराभव आणि सहा मॅच ड्रॉ झाल्या. गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं २१ टेस्ट जिंकल्या होत्या तर धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा २७ टेस्ट मॅचमध्ये विजय झाला होता.