Rohit Sharma: विराटच्या सेलिब्रेशनची रोहितकडून हुबेहुब नक्कल; पहा हिटमॅनचा गमतीशीर व्हिडीओ

Rohit Sharma: 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये हा अवॉर्ड सोहळा पार पडला. दरम्यान या अवॉर्ड सोहळ्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 27, 2024, 12:48 PM IST
Rohit Sharma: विराटच्या सेलिब्रेशनची रोहितकडून हुबेहुब नक्कल; पहा हिटमॅनचा गमतीशीर व्हिडीओ title=

Rohit Sharma: सध्या इंग्लंड विरूद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे. 5 सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येतोय. दरम्यान या सिरीजपूर्वी बीसीसीआयकडून खेळाडूंना खास सेरेमनीमध्ये अवॉर्ड देण्यात आलेत. 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये हा अवॉर्ड सोहळा पार पडला. दरम्यान या अवॉर्ड सोहळ्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

या अवॉर्ड शोमध्ये अँकरने रोहितला त्याच्या सहकाऱ्यांची नक्कल करण्यास सांगितलं. यावेळी रोहितने सूर्यकुमार यादवच्या शॉर्टपासून ते एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटपर्यंत सर्व गोष्टींची नक्कल केली. यादरम्यान रोहितने विराट कोहलीच्या आक्रमक सेलिब्रेशनची नक्कल केली असून चाहत्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. हिटमॅनचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय.

रोहित शर्माचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडिओमध्ये नक्कल करण्यासाठी रोहितने स्वतःच्या पुल शॉटने सुरुवात केली आहे. यानंतर तो विराटचं विकेट-सेलिब्रेशनची नक्कल करताना दिसतोय. इतकंच नव्हे तर सूर्यकुमारच्या सुपला शॉर्टची देखील हिटमॅनने उत्तम पद्धतीने नक्कल केल्याचं दिसून येतंय. 

माझ्या 5 शतकांचा काय फायदा- रोहित

सध्या इंग्लंड विरूद्ध टीम इंडिया यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. यावेळी सामन्याच्या मध्ये रोहित शर्माची छोटी मुलाखत घेण्यात आली. यावेळी रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय आहे.  

रोहित शर्मा म्हणाला की, 'ज्यावेळी मला टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी खूप उत्साही होतो. मी गेल्या 7 ते 8 वर्षात निर्णय घेणाऱ्या कोअर ग्रुपचा एक भाग आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मी काहीवेळा टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. आपल्या देशाचं कर्णधार बनणं हा मोठा सन्मान आहे. मी अनेक महान खेळाडू पाहिले आहेत ज्यांनी त्यांच्या पद्धतीने कर्णधारपद भूषवलंय.

रोहितने पुढे सांगितलंय की, "मी काहीतरी बदल करू इच्छित होतो. सध्या खेळाडू मैदानावर जाऊन स्वतंत्रपणे खेळतायत. मुळात लोकं नंबर्स किंवा व्यक्तीगत स्कोर पाहत नाहीयेत. मी 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाच शतकं झळकावली होती, पण त्याचं काय झालं, हरलोच ना शेवटी?"