एकाच दिवशी दोन देशांमध्ये खेळणार विराट कोहली..

धर्मसंकटात अडकला विराट कोहली

एकाच दिवशी दोन देशांमध्ये खेळणार विराट कोहली.. title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला आता सुपरमॅन बनणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे काय नवं? आता विराट कोहलीला सुपरमॅन बनाव लागणार आहे. बीसीसीआयने आयरलँडच्या विरूद्ध होणाऱ्या टी 20 मॅचसाठी जो संघ निवडला आहे त्या संघाचा कर्णधार हा विराट कोहली आहे. तर दुसरीकडे विराट कोहली जून महिन्यात काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे या दोन महत्वाच्या सामन्यांसाठी आता त्याला सुपरमॅन बनावं लागणार आहे. 

काय आहे हा अजब प्रकार? 

काऊंटीच्या घोषणेनुसार, भारतीय कॅप्टन विराट कोहलीला जून या संपूर्ण महिन्यात काऊंटी क्रिकेट खेळावं लागणार आहे. तिथेच भारताला आयरलँडच्या विरूद्ध टी 20 सामने खेळणार आहेत. जे डबलिनमध्ये 27 आणि 29 जूनला होणार आहेत. कोहलीला सरे काऊंटीच्या शेवटचा सामना हा यॉर्कशरच्या विरूद्ध स्कारबोरोमध्ये 25 ते 28 जून या कालावधीत खेळायची आहे. अशा परिस्थितीत कोहलीला 27 जून या तारखेला एकाच वेळी दोन देशांमध्ये उपस्थित राहावं लागणार आहे. आणि याच गोष्टीसाठी आता कोहलीला सुपरमॅन बनावं लागणार आहे. ज्यामुळे तो एकाचवेळी आयरलँड आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये प्रवास करावा लागणार आहे.

कोहली काय करणार? 

या बाबत टीम इंडियाचे मुख्य प्रवक्ता एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आलं की, ही गोष्ट चुकीने झाली आहे की. तर याबाबत त्यांनी उत्तर दिलं की, कृपया याबाबत तुम्ही बीसीसीआयचे सचिव यांच्याशी बोला. त्यामुळे हे नजरचुकीने झालं आहे की, खरंच कोहलीला एकाच दिवशी दोन देशात खेळावं लागणार आहे. याबाबत मात्र अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.