close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विराटचा कडक शॉट, थोडक्यात वाचला अंपायर

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे.

Updated: Sep 7, 2017, 08:26 PM IST
विराटचा कडक शॉट, थोडक्यात वाचला अंपायर

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं श्रीलंका दौऱ्यातल्या ३ टेस्ट, ५ वनडे आणि एकमेव टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्या आहेत. एकमेव टी-20मध्ये विराट कोहलीच्या ५४ बॉलमध्ये केलेल्या ८२ रन्स आणि मनिष पांडेच्या नाबाद ५१ रन्समुळे भारतानं १७२ रन्सं आव्हान पार केलं.

८२ रन्सच्या खेळीमध्ये विराट कोहलीनं सगळ्याच बॉलर्सची धुलाई केली. लसीथ मलिंगाच्या बॉलिंगवर विराट कोहलीनं मारलेला शॉट अंपायरच्या बाजुनं गेला. बॉलपासून वाचण्यासाठी अंपायरला मैदानामध्येच झोपावं लागलं. बॉलपासून बचाव करताना छोटीशी चूकही अंपायरला महागात पडली असती.

पाहा विराटचा तो शॉट