दुबईत Virat Kohli ची मुलीसोबत Breakfast Date

विराट कोहली वामिकासोबत खेळताना दिसत असून या फोटोवर चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे

Updated: Oct 20, 2021, 04:44 PM IST
दुबईत Virat Kohli ची मुलीसोबत Breakfast Date

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोत वामिकाचा चेहरा दिसत नाही. वामिका खुर्चीवर बसून तिच्या आई-बाबांसोबत नाश्ता करताना दिसतेय. 

विराट कोहलीच्या आधी अनुष्का शर्मानेही विराट कोहली आणि मुलगी वामिकाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोतही वामिकाचा चेहरा दडलेला दिसतोय, पण विराट कोहली वामिकासोबत खेळताना दिसत असून या फोटोवर चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. हे फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले - "माझे संपूर्ण हृदय एका फ्रेममध्ये" 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुष्का शर्माने अष्टमीच्या निमित्ताने मुलगी वामिकासोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले - मला दररोज धाडसी आणि अधिक धैर्यवान बनवत आहे. माझी छोटी बाई अष्टमीच्या शुभेच्छा !