कोलकाता : कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनच्या मैदानावर सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खराब रेकॉर्ड केला.
भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली शून्यावर बाद झाला. सुरंगा लकमलने विराटला शून्यावर पायचित केले. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या कपिल देवच्या यादीत विराटचेही नाव सामील झालेय. १९८३च्या वर्ल्डकप विजेता भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवने त्याच वर्षात पाच वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड केला होता.
विराट कोहली २०१७ या वर्षात तीनही प्रकारांत ५ वेळा शून्यावर बाद झालाय. यासोबतच त्याने कपिल देवच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटर
5 - कपिल देव, 1983
5* - विराट कोहली, 2017
4 - बिशन सिंह बेदी, 1976
4 - सौरव गांगुली, 2001 आणि 2002
4 - एमएस धोनी, 2011