कानपूर : 2017 या वर्षात तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांमध्ये विराट कोहली पहिला खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 10 रन्स केल्यावर विराटनं या वर्षात दोन हजार रन्सचा टप्पा गाठला. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. आमलानं यंदाच्या वर्षी 34 मॅचमध्ये 1988 रन्स बनवल्या आहेत.
2017 या वर्षी कोहलीनं 58.82च्या सरासरीनं 8 अर्धशतकं आणि 7 शतकं झळकावली आहेत. यंदाच्या वर्षी 204 हा कोहलीचा सर्वाधिक स्कोअर आहे. विराट आणि हशीम अमलानंतर जो रूट, फॅप डुप्लेसिस आणि क्वांटन डीकॉक यांनी यावर्षात सर्वाधिक रन्स बनवल्या आहेत.
याचबरोबर लागोपाठ दोन वर्षांमध्ये कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार रन्सचा टप्पा ओलांडला आहे. 2016 आणि 2107मध्ये विराटनं हे रेकॉर्ड केलं. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकरनं 1996, 1997 आणि 1998 मध्ये प्रत्येक वर्षी 2 हजारपेक्षा जास्त रन्सचा टप्पा गाठला होता.
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक रन्स बनवणारा कॅप्टन बनला आहे. याआधी रिकी पॉटिंगनं 2007साली 1424 रन्स, मिसबाह उल हकनं 2013मध्ये 1373 रन्स आणि अजहरनं 1998मध्ये 1268 रन्स बनवल्या होत्या.