'विराट'विक्रम, द्रविडला टाकलं मागे, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

२०१७मध्ये धावांचा डोंगर करणारा विराट कोहली २०१८ मध्येही रेकॉर्ड वर रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

Updated: Feb 10, 2018, 08:46 PM IST
'विराट'विक्रम, द्रविडला टाकलं मागे, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय title=

जोहान्सबर्ग : २०१७मध्ये धावांचा डोंगर करणारा विराट कोहली २०१८ मध्येही रेकॉर्ड वर रेकॉर्ड ब्रेक करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर कोहलीनं दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १५३ रन्सची खेळी केली. टेस्टमध्ये विराटची बॅट तळपली नसली तरी वनडे क्रिकेटमध्ये मात्र विराटची बॅट जोरदार चालतेय.

पहिल्या वनडेमध्ये विराटनं शतक झळकावलं. तर दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं अर्धशतकीय खेळी केली. तिसऱ्या वनडेमध्ये विराटनं १६० रन्सची नाबाद खेळी केली. चौथ्या वनडेमध्ये ७५ रन्स करून विराट आऊट झाला. पण विराट कोहलीनं आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर या दौऱ्यात विराटच्या ६४७ रन्स पूर्ण झाल्या. विराट आता परदेश दौऱ्यामध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा भारतीय कॅप्टन बनला आहे. याआधी हे रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होतं.

द्रविडनं २००६साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर ६४५ रन्स केले होते. तर विराट कोहलीनं २०१७ साली श्रीलंका दौऱ्यावर एकूण ५७३ रन्स केल्या होत्या. या यादीमध्ये मोहम्मद अझहरुद्दीन चौथ्या क्रमांकावर आहे. अझहरनं १९९०च्या इंग्लंड दौऱ्यावर ५४४ रन्स केल्या होत्या.