कर्णधार विराट कोहलीच्या या ट्विटने खळबळ, लवकरच येणार खुशखबर!

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून ब्रेक घेऊन आराम करतोय. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर विराट पत्नी अनुष्कासोबत वेळ घालवतोय. 

Updated: Mar 12, 2018, 10:27 AM IST
कर्णधार विराट कोहलीच्या या ट्विटने खळबळ, लवकरच येणार खुशखबर! title=

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून ब्रेक घेऊन आराम करतोय. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर विराट पत्नी अनुष्कासोबत वेळ घालवतोय. 

नुकतेच विराटने ट्विटरवर एक ट्वीट केलेय जे वाचून विराटचे फॅन्सही हैराण झालेत. 

कोहलीने केले ट्वीट

कोहलीने नुकतेच ट्विट केले ज्यात सगळं काही चांगलं इथे होतंय. लवकरच तुम्हाला खुशखबर मिळेल. असे लिहिलंय. हे ट्वीट वाचून विराटचे फॅन्सही हैराण झालेत. 

 

द. आफ्रिका दौऱ्यानंतर घेतला ब्रेक

द. आफ्रिका दौऱ्यावर असताना विराट कोहलीने विश्रांतीचा मुद्दा मांडला होता. यामुळे श्रीलंकेत होत असलेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत त्याला आराम देण्यात आला.

विराटसोबतचा अनुष्काने शेअर केला फोटो

विराट आणि अनुष्का एकमेकांन क्वालिटी टाईम देतायत. अनुष्काने विराटसोबत रोमँटिक सेल्फी शेअर केलाय.