नवा टॅटू बनवण्यासाठी मुंबईला पोहोचला विराट, फोटो व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला टॅटू बनवणं आवडतं. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर मायदेशी परतलेल्या कोहलीने आणखी एक नवीन टॅटू बनवला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 4, 2018, 12:36 PM IST
नवा टॅटू बनवण्यासाठी मुंबईला पोहोचला विराट, फोटो व्हायरल title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला टॅटू बनवणं आवडतं. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर मायदेशी परतलेल्या कोहलीने आणखी एक नवीन टॅटू बनवला आहे.

मुंबईला टॅटू बनवण्यासाठी आलेल्या कोहलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बांद्रा येथील एलियन टॅटूमध्ये विराटने टॅटूचे अनेक सॅम्पल पाहिले.

विराटने त्याच्या खांद्यावर अगोदरच 'गॉड्स आय'चा टॅटू बनवला आहे, सोबतच टेस्ट कॅप नंबर 269, वनडे कॅप नंबर 175 या शिवाय त्याने त्याचे वडीव प्रेम कोहली आणि आई सरोज कोहली यांचं नाव देखील काढलं आहे.