पेप्सीची जाहिरात करण्यास विराटचा नकार

भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. 

Updated: Jun 7, 2017, 06:43 AM IST
पेप्सीची जाहिरात करण्यास विराटचा नकार  title=

मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. साखर आणि कार्बोनेटेड असलेल्या कोल्ड ड्रिंकमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत कोहली साशंक असल्यामुळे कोहलीनं पॅप्सीची जाहिरात करायला नकार दिला आहे. ज्या गोष्टी मी खात आणि पित नाही त्या गोष्टींची जाहिरात मी पैसे मिळतात म्हणून कशी करू असा सवालही कोहलीनं उपस्थित केला आहे.

फिटनेसमध्ये बदल केल्यानंतर माझ्या खानपानामध्येही बदल झाला यामुळे मी अशा जाहिराती करणार नसल्याचं विराट नुकत्याच एका मुलाखतीमध्ये म्हणाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कोहली पेप्सीचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होता.