VIRAL VIDEO : सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट भावूक!

ही सीरिज कोण जिंकतंय? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय

Updated: Jul 17, 2018, 02:26 PM IST
VIRAL VIDEO : सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट भावूक! title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेपूर्वी भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओतून कॅप्टन कोहलीनं प्रोत्साहन देण्यासाठी फॅन्सचे आभार मानलेत. या व्हिडिओत स्टेडियममध्ये बसलेले फॅन्स मॅचपूर्वी भारताचं राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. व्हिडिओत फॅन्सच्या हातात तिरंगा दिसतोय... यामुळेही स्टेडियममध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. फॅन्सच्या याच जोश आणि भावनेला सलाम ठोकलाय. 

'हा व्हिडिओ पाहणं हीच गर्वाची गोष्ट आहे. टीमला पाठिंबा देण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार... तुमचं प्रेम नेहमीच चांगलं खेळण्यासाठी प्रोत्साहक ठरतं' असं विराटनं या पोस्टमध्ये म्हटलंय. 

मंगळवारी भारत - इंग्लंडविरुद्ध सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वन डे मॅच खेळली जाणार आहे. भारतानं सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये आठ विकेट राखत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडनं पलटवार करत भारताला ८६ रन्सनं पछाडलं होतं. त्यामुळे सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये फायनल निकाल लागणार आहे. आता ही सीरिज कोण जिंकतंय? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.