मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी चौथा नंबर सोडून सगळी टीम ठरवली गेल्याचं म्हटलं आहे. कोहलीने म्हटलं की, ज्या खेळाडूंनी घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली तेच खेळाडू इंग्लंडमध्ये देखील चांगली कामगिरी करतीलच असं नाही. कोहलीने म्हटलं की, 'आम्ही इंग्लंडमध्ये वर्ल्डकप खेळण्यासाठी जावू तेव्हा तेथील वातावरण हे घरच्या मैदानापेक्षा खूपच वेगळं असेल. कोणता खेळाडू कोणत्या परिस्थितीमध्ये कसा खेळतो हे पाहावं लागेल. वर्ल्डकपसाठीची टीम जवळपास निश्चित झाली आहे. फक्त चौथ्या नंबरवर कोण खेळेल आणि कोणाला संधी दिली पाहिजे याबाबत निर्णय घेणं बाकी आहे.'
कोहलीने पुढे म्हटलं की, काही गरज पडल्यास त्यात बदल देखील होऊ शकतो. तुम्हाला माहित नसतं की कोणता खेळाडू फॉर्ममध्ये आहे आणि कोण नाही.' कोहली टीममधील ताळमेळ पाहता खूश आहे. स्पिनर युजवेंद्र चहल आणि चायनामॅन कुलदीप यादववर त्याचा विश्वास आहे. याशिवास केदार जाधव देखील गरज पडल्यास बॉलिंग करु शकतो त्यामुळे टीम मजबूत असल्याचं कोहलीचं म्हणणं आहे.