Virat Kohli ची विकेट घेणं स्वप्न होतं, ऑस्ट्रेलियाच्या या बॉलरचा खुलासा

विराट कोहलीची विकेट घेण्याची अनेकांची इच्छा असते. ऑस्ट्रेलियाच्या या बॉलरने हे त्याचं स्वप्न असल्याचं  म्हटलं आहे.

Updated: Mar 1, 2022, 03:56 PM IST
Virat Kohli ची विकेट घेणं स्वप्न होतं, ऑस्ट्रेलियाच्या या बॉलरचा खुलासा title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. आपल्या फलंदाजीने त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी मने जिंकली. म्हणूनच आज जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. विराट कोहलीच्या फलंदाजीचे अनेक क्रिकेटर देखील फॅन आहेत. विराटकडून नेहमीच अनेक खेळाडू धडे घेताना दिसले आहेत. तर अनेक असे बॉलर्स देखील आहेत ज्यांना विराट कोहलीची विकेट घेणं स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतं.

ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर स्टीफन ओ'कीफेने सांगितले की, पुण्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2017 च्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीची विकेट घेणे हे त्याचे स्वप्न होते. त्या सामन्यात स्टीफन ओ'कीफने भारतीय संघाचे दोन डावात 12 विकेट घेतले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. या मालिकेत रविचंद्रन अश्विनने एका वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा डेल स्टेनचा (78) विक्रम मोडला होता.

स्टीफन ओ'कीफे एका कार्यक्रमात म्हटले की, 'माझी सर्वात स्मरणीय विकेट बहुधा भारतातील विराट कोहलीची होती. मी त्याला पवेलियनमध्ये परत पाठवले होते. भारतीय फलंदाज क्रीजच्या बाहेर फलंदाजी करत होते, मी त्याचा फायदा घेत त्यांना गुगली बॉल टाकला. विराटने हा चेंडू खेळला नसता तर कदाचित तो आऊट झाला नसता.

भारत 2-1 ने जिंकला
 
पुण्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून देण्यात स्टीफन ओ'कीफने महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्यानंतरच्या तीन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली ठरली नव्हती. भारताने 2-1 असा विजय मिळवला होता.'

टीम इंडियाने मागील घरच्या मालिकेत सर्व 9 कसोटी खेळणाऱ्या देशांचा पराभव केला होता, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर असे करणारा भारत हा तिसरा संघ होता. या मालिकेदरम्यान, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार असलेला भारताचा 33 वा कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे, पदार्पणाचा सामना जिंकणारा 9 वा भारतीय कर्णधार ठरला होता.