केप'टाऊन'मध्ये विराट पुजाराचा रेकॉर्ड 'डाऊन', पहा काय सांगतेय आकडेवारी

न्यूलँड्सच्या या मैदानावरील भारतीय फलंदाजांचे रेकॉर्ड्स पाहिले तर ते काहीसे चांगले दिसत नाही.

Updated: Jan 8, 2022, 01:01 PM IST
केप'टाऊन'मध्ये विराट पुजाराचा रेकॉर्ड 'डाऊन', पहा काय सांगतेय आकडेवारी title=

केपटाऊन : भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या सीरीजमधील शेवटचा आणि निर्णायक सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. सध्या दोन्ही टीममधील ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी भारत जिंकल्यास मोठा इतिहास घडणार आहे. कारण आफ्रिकन भूमीवर भारताने अजून एकदाही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही. 

मात्र न्यूलँड्सच्या या मैदानावरील भारतीय फलंदाजांचे रेकॉर्ड्स पाहिले तर ते काहीसे चांगले दिसत नाही. या मैदानावर आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाने 500 टेस्ट रन्स केलेले नाहीत.

सध्याच्या भारतीय टीम पाहिल्यास, कर्णधार विराट कोहली न्यूलँड्सच्या या मैदानावर आतापर्यंत केवळ एकच कसोटी सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने दोन डावांमध्ये 16.50 च्या सरासरीने केवळ 33 धावा केल्या आहेत.

कोहली-पुजारापेक्षा अश्विनचा रेकॉर्ड चांगला

मुख्य म्हणजे कोहलीपेक्षाही चेतेश्वर पुजाराचा विक्रम वाईट आहे. त्याने या मैदानावर आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले असून तीन डावांमध्ये 10.66 च्या सरासरीने केवळ 32 रन्स केले आहेत. 

दरम्यान टीम इंडियाचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने या मैदानावर कोहली आणि पुजारा या दोघांपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. अश्विनने एक कसोटी सामना खेळताना दोन डावांमध्ये 24.50 च्या सरासरीने 49 धावा केल्या.

न्यूलँड्सवर सध्याच्या भारतीय टीममधील टॉप-3 स्कोरर

अश्विन- 1 टेस्ट 49 रन्स
कोहली- 1 टेस्ट 33 रन्स
पुजारा - 2 टेस्ट  32 रन्स

सध्याच्या टीम इंडियामध्ये असणाऱ्या फक्त या तीन खेळाडूंना केपटाऊनच्या या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. सर्व भारतीय खेळाडूंमध्ये पाहिलंतर या मैदानावर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 489 धावा केल्या आहेत. सचिनने या ठिकाणी 4 कसोटी सामनेही खेळलेत. 

सचिननंतर दुसरा क्रमांक भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आहे. ज्याने या मैदानावर दोन कसोटी सामने खेळून 165 रन्स केलेत. या मैदानावर आतापर्यंत एकाही भारतीयाला 500 रन्सचा टप्पा गाठता आला नाहीये.

केपटाऊनमध्ये ओव्हरऑल भारतीय टीममधील टॉप-5 स्कोरर

सचिन तेंडुलकर- 4 टेस्ट 489 रन्स
सौरव गांगुली-  2 टेस्ट  165 रन्स
गौतम गंभीर - 1 टेस्ट  157 रन्स
राहुल द्रविड़-  3 टेस्ट  126 रन्स
मोहम्मद अझरुद्दीन-  2 टेस्ट  124 रन्स