विराटचे हे ट्विट बनले २०१७ सालचे गोल्डन ट्विट !

क्रिकेटच्या विश्वात अनेक दिग्गजांचे विक्रम मोडणारा विराट कोहली आता सोशल मीडियावरही लोकप्रिय ठरला आहे. 

Updated: Dec 13, 2017, 06:15 PM IST
विराटचे हे ट्विट बनले २०१७ सालचे गोल्डन ट्विट !   title=

मुंबई : क्रिकेटच्या विश्वात अनेक दिग्गजांचे विक्रम मोडणारा विराट कोहली आता सोशल मीडियावरही लोकप्रिय ठरला आहे. 

विरूष्काच लग्न 

सोमवारी इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर विराट आणि अनुष्का लग्नबंधनात अडकले आहेत. रात्री सुमारे 8.30 वाजता त्यांनी या बातमीची घोषणा केली. 

 

सोशल मीडियावर धूम  

ट्विटरवर विराट कोहलीने लग्नाची घोषणा केल्याची माहिती समजताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. विराटचे हेच ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट ठरले आहे. विराटच्या या ट्विटला आतापर्यंत ८६ हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.  

सूर्याचा रेकॉर्ड मोडीत काढला 

विराटपूर्वी तामिळ सिनेसृष्टीतील सूर्याच्या ट्विटला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता. सूर्याने त्याच्या चित्रपटाच्या सेकंड लूकची ट्विटरच्या माध्यमातून भेट दिली होती. या ट्विटला सुमारे ७४ हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केले होते.  'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?

सचिनही होता शर्यतीमध्ये  

२०१३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या एका ट्विटला १६ हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केले होते. त्यावर 13हजार लाईक्सही मिळाले होते. मात्र आता विराटने सचिनचा ट्विटरवरील रेकॉर्डही मोडीत काढला आहे.