कोण आहे ही तरुणी? विराटचा हा गोलंदाज करत होता जिच्यासोबत फ्लर्ट

आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सपोर्ट स्टाफची सदस्य नवनीता गौतम (Navnita gautam) सध्या बऱ्याच चर्चेत आहे. 

Updated: Sep 25, 2021, 08:24 PM IST
कोण आहे ही तरुणी? विराटचा हा गोलंदाज करत होता जिच्यासोबत फ्लर्ट

मुंबई : आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सपोर्ट स्टाफची सदस्य नवनीता गौतम (Navnita gautam) सध्या बऱ्याच चर्चेत आहे. अलीकडेच, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील या संघाच्या गोलंदाजाचा एक फोटो व्हायरल झाला की तो नवनीतासोबत फ्लर्ट करतांना दिसत होता. तेव्हापासून, आरसीबीची ही मसाज थेरपिस्ट (massage therapist) सतत चर्चेत आहे.

आरसीबीच्या (RCB) सपोर्ट स्टाफमध्ये नवनीता गौतम ही एकमेव महिला आहे. ती टीमची मसाज थेरपिस्ट आहे आणि अलीकडेच काइल जॅमीसनचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात नवनीता देखील डगआउटमध्ये बसली होती. हा फोटो व्हायरल होत असताना, हे देखील उघड झाले की केली जेमीसन तिच्यासोबत फ्लर्ट करत आहे.

हा फोटो समोर येताच नवनीता गौतमने सोशल मीडियावर ट्रेंड करायला सुरुवात केली. प्रत्येकजण तिच्याबद्दल शोधू लागला. याबद्दल एक मोठी माहिती समोर आली की नवनीताने यापूर्वी 2017 मध्ये भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगवर उपचार केले होते.

नवनीताने 24 नोव्हेंबर 2017 रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम प्रोफाइलवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिने लिहिले होते की, भारताच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक युवराज सिंगवर उपचार करण्याची संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद, माझे स्वप्न पूर्ण झाले.

नवनीता गौतम 2019 मध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून आरसीबीशी जोडली गेली. ती कॅनडामध्ये असते. तिचा जन्म 11 एप्रिल 1992 रोजी व्हँकुव्हरमध्ये झाला. विशेष गोष्ट म्हणजे नवनीता या फ्रँचायझीच्या सपोर्ट स्टाफचा भाग असणाऱ्या पहिली आणि एकमेव महिला आहे. आयपीएलच्या 8 संघांमध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून नवनीता गौतम एकमेव महिला कर्मचारी आहे.

RCB चा पहिला सामना IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होता. या सामन्यादरम्यान, जेव्हा कॅमेरामनने कॅमेरा डगआउटच्या दिशेने वळवला, तेव्हा किवी खेळाडू केली जेमीसन नवनीता गौतमकडे पाहून हसत होता.

कॅमेऱ्याने जेमसनला फ्लर्ट करताना पकडताच हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नवनीताबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले.