धनाश्री वर्माचा World Cup चॅलेंज तुम्हा स्वीकारणार? व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

धनश्री वर्माचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Updated: Sep 25, 2021, 08:23 PM IST
धनाश्री वर्माचा World Cup चॅलेंज तुम्हा स्वीकारणार? व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा title=

मुंबई : धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक चाहते आहेत जे तिच्या व्हिडीओची नेहमीच वाट पाहत असताता. ज्यामुळे धनश्रीने व्हिडीओ टाकताच ते मोठ्याप्रमाणावर शेअर आणि लाईक केले जातात.

धनश्री वर्मा भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी आहे आणि ती एक उत्तम डान्सर देखील आहे. धनश्री वर्माचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दरम्यान, तिचा आणखी एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती वर्ल्डकपसाठी आनंद व्यक्त करत नाचताना दिसत आहे.

धनश्रीने हा व्हिडीओ तिच्या घराच्या छतावर शूट केला आहे. खरं तर, टी 20 वर्ल्ड कप 2021, 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि धनश्रीवर त्याचा उत्सव आतापासूनच साजरा करायला सुरूवात केली आहे.

व्हिडीओ शेअर करत धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिली, "दिल की सुनो, अब समय आ गया है #LiveTheGame जर तुम्हाला क्रिकेट आवडते आणि माझ्यासारखे डान्स करायला आवडते, तर  #LiveTheGame चॅलेंजमध्ये सामील व्हा आणि तुम्हाला ते कसे आवडते ते आम्हाला दाखवा! तसेच, आपल्या मित्रांना टॅग करायला विसरू नका! मित्रांनो आपल्या युक्त्या दाखवण्याची वेळ आली आहे."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धनश्रीच्या या आनंदात चाहतेही सामील झाले आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले 'सुपरबब'.

नुकतेच धनश्री वर्माचे 'ओये होये' हे गाणे रिलीज झाले आहे, जे चाहत्यांना खूप आवडत आहे. या गाण्यात धनश्री आणि जस्सी गिल यांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. दुसरीकडे, धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. धनश्रीचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहेत.