नवी दिल्ली : मुल्तानचा सुलतान, नजफगढचा नवाब विस्फोटक विरू अशी अनेक बिरूद त्याला आपल्या क्रिकेट करियरमध्ये मिळाली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या विरेंद्र सेहवागची बॅट अजूनही तळपतेच आहे. सेहवाग जेव्हा जेव्हा खेळला बिनधास्त खेळला हे आपण सर्वांनीच पाहिलंय. कधी कोणत्या बॉलरचं दडपण त्याने घेतलं नाही. बड्या बड्या बॉलर्सना त्याने हैराण करून सोडलं. निवृत्तीच्या 5 वर्षांनंतरही त्याची बॅट थंड झालेली नाही हे पुन्हा दिसून आलंय.
This six @virendersehwag You Beautypic.twitter.com/vzE6BQu5wA
— Hem Dev (@Real_hem) September 9, 2018
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एका प्रदर्शनी मॅच दरम्यान सेहवागने 400 च्या रनरेटने रन्स केले. रिटार्टमेंटनंतर त्याची विस्फोटक खेळी पाहून चाहत्यांच पारण फिटलं. या धमाकेदार खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियाच चर्चेचा विषय बनलाय.
The first over by Viru pic.twitter.com/rjPBgseras
— Tushar Misra (@tusharmisra) September 9, 2018
कर्नाटक छलानाचित्रा कप (KCC) च्या मॅचमध्ये विरू कादंबा लायंस टीममधून खेळत होता. या मॅचमध्ये सेहवागने एकूण किती रन्स केले हे तर कळालं नाही पण त्याची बॅटींग पाहून दिसतय की त्याने 400 च्या एवरेजने रन्स केले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 4 बॉल्सचा सामना करत 1 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने एकूण 15 रन्स बनविले.