Virendra Sehvag on Deepti Sharma Mankaded Charlotte Dean : भारताच्या पोरींनी इग्लंडच्या महिला संघाला ज्या पद्धतीने धूळ चारली त्याची चर्चा जगभर होत आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करता 3-0 असा व्हाईटवॉश दिला आहे. (ENG W vs IND W 3rd ODI) भारताच्या दीप्ती शर्माने चार्ली डीनला नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट केलं. त्यानंतर मात्र इंग्लंडच्या खेळाडूंना भर मैदानात रडू कोसळलं. यानंतर इंग्लंडचे फॅन्स सोशल मीडियावर चीटिंग केल्याचं हिणवू लागले. मग काय निवृत्त झाल्यावरही सोशल मीडियावर फटकेबाजी करणाऱ्या विरेंद्र सेहवागने इंग्लंडचे फॅन्सची बोलती बंद केली आहे. (Virendra Sehvag on Deepti Sharma Mankaded Charlotte Dean)
काय म्हणाला सेहवाग?
सेहवागने दोन फोटो पोस्ट केले असून कॅप्शनमध्ये, पराभूत झालेल्या इंग्लंडच्या काही खेळाडूंना पाहून आनंद झाला. पहिल्या फोटोमध्ये खेळ त्यांचाच आहे मात्र तरीही ते नियम विसरले. तर दुसऱ्या फोटोमध्ये सेहवागने नियमाबद्दल माहिती दिली आहे. यावेळी सेहवागने नियम 41.16.1 संदर्भ दिला आहे.
चेंडू टाकण्याच्या वेळी तो फेकेपर्यंत जर नॉन-स्ट्रायकर असलेला खेळाडू क्रीज सोडून धाव घेण्यासाठी आधीच पुढे जात असेल. त्यावेळी बॉलरने चेंडू, स्टम्पवर लावला तर त्या खेळाडूला बाद ठरवलं जातं. चेंडू स्टम्पला लावल्यानंतर खेळाडू माघारी पोहोचला तर काही फरक पडत नाही.
"If wrong with me , then wrong for whole world"
-England policyIf Non striker #runout is Debatable, then, how can winning a world cup Final by counting Total number of boundaries is correct #Engvsnz ? #ENGvsIND @ashwinravi99 @virendersehwag @StuartBroad8 @jornovinaypande pic.twitter.com/7amhEWZRmv
— Hardik Khandelwal (@hardik_700) September 24, 2022
Funny to see so many English guys being poor losers. #Runout . pic.twitter.com/OJOibK6iBZ
— Virender Sehwag (@virendersehwag) September 24, 2022
दरम्यान, दीप्ती शर्मा रविवारी सकाळी ट्विटरवर ट्रेंडिंगला होती. अनेक युजर्सनी तिला पाठिंबा दर्शवला होता. सामन्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुरुवातीला तिने टाळण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा विचारलं असता त्याने इंग्लिश समालोचकाला सडेतोड उत्तर दिलं. हरमनप्रीत म्हणाली, "आम्ही घेतलेल्या उर्वरित 9 विकेट्सबद्दल तुम्ही विचारलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येतं. आम्ही कोणतीही चूक केली नाही."