विरेंद्र सेहवागला का विचारतायत तुझ्यासोबत बाथरूममध्ये कोण होतं?

विरेंद्र सेहवागचा फोन शॉवरखाली पडल्यानंतर त्याला असं का विचारतायत की बाथरूममध्ये कोण होतं?

Updated: Aug 3, 2021, 07:17 PM IST
विरेंद्र सेहवागला का विचारतायत तुझ्यासोबत बाथरूममध्ये कोण होतं?

मुंबई: विरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. नुकतंच विरेंद्र सेहवागने त्याच्या सोशल मीडियावर त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. बाथरूममध्ये शॉवरखाली फोन पडल्याचं त्याने ट्वीट करताच सोशल मीडियावर त्यांना युझर्सनी भंडावून सोडलं आहे. बाथरूममध्ये नेमकं कोण होतं असा युझर्सनी प्रश्न विचारला आहे. 

सोशल मीडियावर विरेंद्र सेहवागने पोस्ट करत आपला नंबर शेअर केला आहे. त्यानंतर अनेकांनी विरेंद्र सेहवागचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र काही युझर्सनी तर सेहवागला बाथरूममध्ये कोण होतं? तुमचा फोन शॉवरखाली कसा पडला असा प्रश्नही विचारला आहे. सोशल मीडियावर अनेका युझर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. 

माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने एक नंबर शेअर केला आहे. त्यासोबत लिहिलं आहे की माझा फोन शॉवर खाली पडला आहे. मी फोनला नीट करत आहे मला या नंबरवर फोन करा असं आवाहन त्याने केलं. अनेक युझर्सनी या नंबरवर फोनही केला. मात्र सेहवागची जाहिरात येत असल्यानं युझर्सनी फेक कॉल असं म्हटलं आहे. 

एका युझरने तर याला फ्रॉड कॉल असंही म्हटलं आहे शिवाय त्याने फोन केल्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. त्यामुळे अनेक युझर्सनी यावर वेगवेगळ्या कमेंट करत सेहवागला बाथरूममध्ये कोण होतं ज्यांनी फोन पाडला असा प्रश्न विचारला आहे. सेहवागच्या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.