नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केलाय. माजी कर्णधार धोनीला मिळालेल्या यशामागे दादाचा हात असल्याचे वक्तव्य सेहवागने केलंय.
मीडिया रिपोर्टनुसार एका टीव्हीवरील शोदरम्यान सेहवागने हे विधान केलंय. सौरव गांगुलीमुळेच धोनी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकला, असं सेहवाग म्हणाला.
सेहवाग म्हणाला, त्यावेळी आम्ही फलंदाजीच्या ऑर्डरमध्ये नवनवीन प्रयोग करत होतो. त्यावेळी आम्ही विचार केला की जर सलामीची जोडी चांगली खेळली तर गांगुली तिसऱ्या नंबरवर गांगुली फलंदाजी करेल. समजा सलामीची जोडी चांगली खेळी करण्यात अपयशी ठरली तर इरफान आणि धोनीसारखे हिटर्स मैदानात उतरतील.
त्यामुळे गांगुलीने धोनीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय़ घेतला. गांगुली नेहमीच नवोदित खेळाडूंना संधी देत असे. जर गांगुलीने असे केले नसते तर धोनी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक नसता.