विरूष्काच्या मुंबई रिसेप्शन पार्टीला सेलिब्रिटींची हजेरी

११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेले 'विरूष्का' चे आज मुंबईत रिसेप्शन  आहे. यापूर्वी २१ डिसेंबरला विरूष्काच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन दिल्लीत झाले होते.  

Updated: Dec 26, 2017, 10:05 PM IST
विरूष्काच्या मुंबई रिसेप्शन पार्टीला सेलिब्रिटींची हजेरी  title=

मुंबई : ११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेले 'विरूष्का' चे आज मुंबईत रिसेप्शन  आहे. यापूर्वी २१ डिसेंबरला विरूष्काच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन दिल्लीत झाले होते.  

मुंबईत पार्टीला सुरूवात 

मुंबईमध्ये लोअर परेल भागात 'हाई राईज' मध्ये विरूष्काच्या लग्नाचे रिसेप्शन रंगणार आहे. इटलीमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये विरूष्काचे लाग्न पार पडले. त्यानंतर भारतातील रिसेप्शन सोहळ्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या जवळील नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी होणार आहे.  

सेलिब्रिटींची हजेरी  

विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला सुमारे ६०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईतील रिसेप्शनला अभिनेता बोमन इराणी, संदीप पाटील सपत्निक पोहचले आहेत. सोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे पोहचले आहेत. 

 

विरूष्काने शाहरूख खान, आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही आमंत्रित केले आहे.