पाकिस्तानच्या दिग्गज बॉलरला जीवे मारण्याची धमकी, इम्रान खानकडे मागितली मदत

पाकिस्तानच्या या बॉलरला का मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं होतं?

Updated: Jun 3, 2021, 02:54 PM IST
पाकिस्तानच्या दिग्गज बॉलरला जीवे मारण्याची धमकी, इम्रान खानकडे मागितली मदत title=

मुंबई: पाकिस्तानचा महान आणि वेगवान गोलंदाजाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वेस्ट इंडिजच्या धुरंधर फलंदाजाने ही धमकी दिली होती. यासंदर्भात पाकिस्तानच्या बॉलरने स्वत:खुलासा केला आहे. पाकिस्तानचा ज्येष्ठ गोलंदाज वसीम अकरम याने यासंदर्भात खुलासा केला आहे. 

वसीम अकरमने सांगितले होते की एकदा क्रिकेटच्या मैदानावर व्हीव्ही रिचर्ड्सला स्लेज करण त्याला खूप महागात पडलं होतं. रिचर्ड्ससारख्या फलंदाजाशी पंगा घेणं सोपं नाही. पण पुन्हा स्लेजिंग केलं तर जीवे मारून टाकीन अशी धमकीच त्याने अकरमला दिली होती. 

'व्हीव्ही रिचर्डसनला देखील माझे बॉल खेळणं कठीण जात होतं. मी वेगानं टाकलेल्या बाऊन्सरमुळे रिचर्डसनची कॅप खाली पडली. त्यावेळी कोणी मॅच रेफरी वैगरे नव्हते. त्यावेळी मी त्याच्याजवळ जाऊन तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये स्लेजिंग केलं. त्याने माझ्याकडे रागात पाहिलं आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली', असं वसीम अकरमने सांगितलं.

या सगळ्यामध्ये इम्रान खान यांची मदत घेतली. त्यावेळी व्हीव्ही रिचर्ड्सनला घामाने ओथंबलेल्या अवस्थेत पाहिलं. त्याच्या हातात बॅट होती. त्याचा अवतार पाहून अकरम घाबरला आणि त्याने माफी मागितली. पुन्हा असं होणार नाही याचं आश्वासन देखील अकरमने दिलं. रिचर्ड्सनं त्याला म्हणाला 'हेच तुझ्यासाठी चांगल आहे अन्यथा याचे परिणाम वाईट झाले असते.'

पाकिस्तानचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज वसीम अकरमचा आज 55वा वाढदिवस आहे. त्याने आपल्या करियरमध्ये 104 कसोटी सामने खेळून 414 विकेट्स घेतल्या तर 356 वन डे सामने खेळून 502 विकेट्स घेतल्या आहेत.