VIDEO : सेंचुरिअनमध्ये आफ्रिकेला मात देण्यासाठी टीम इंडियाची अनोखी प्रॅक्टिस

वर्नोन फिलँडरच्या आक्रमणामुळे चोटीचे फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये खराब प्रदर्शन केलं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 11, 2018, 06:17 PM IST
VIDEO : सेंचुरिअनमध्ये आफ्रिकेला मात देण्यासाठी टीम इंडियाची अनोखी प्रॅक्टिस  title=

मुंबई : वर्नोन फिलँडरच्या आक्रमणामुळे चोटीचे फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये खराब प्रदर्शन केलं. 

भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्याच टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये चौथ्या दिवशी 72 धावांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय गोलंदाजांनी जिंकण्यासाठी टीमला छान सुरूवात करून दिली होती. मात्र ते शक्य झालं नाही त्यामुळे आता टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

आता टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी सेंचुरियनमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा सुरूवातीपासूनच दबदबा आहे. अशात आता 13 जानेवारी रोजी दुसरी टेस्ट मॅच भारतासाठी मोठं आव्हान ठेवलं आहे. न्यूलँड क्रिकेट मैदानावर खेळलेल्या तीन टेस्ट मॅचच्या सिरिजमध्ये पहिल्या चार दिवशी दक्षिण आफ्रिकेने 1-0 असा स्कोर केला आहे. मात्र आता टीम इंडियाने कंबर कसली आहे. 

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये निराशा मिळाल्यानंतर एकदा पुन्हा नव्या उत्साहासोबत टीम इंडिया सेंच्युरियनमध्ये वापसी करणार आङे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू वॉर्म अप करताना दिसले. तसेच यासाठी खेळाडूंनी अनोखी वॉर्म प्रॅक्टिस देखील सुरू केली आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कोहली आपल्या खेळाडूंसोबत कशी प्रॅक्टीस करत आहे.