IPL 2023 SRH vs RR: पापणी पण लवली नाय अन् उमरानने उडवल्या पडीक्कलच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: राजस्थानचा नव्या दमाचा खेळाडू देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) मैदानात आला. त्यावेळी त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. लेफ्ट हॅडर खेळाडूला पाहून भुवीने उमरानला (umran malik) पुन्हा बोलवलं. 

Updated: Apr 2, 2023, 05:51 PM IST
IPL 2023 SRH vs RR: पापणी पण लवली नाय अन् उमरानने उडवल्या पडीक्कलच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO
IPL 2023,SRH vs RR,umran malik,Devdutt Padikkal,

Umran Malik, IPL 2023: आयपीएलचा चौथा सामना हैदराबादच्या मैदानावर खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्स (Rajastan royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs RR) यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. त्यावेळी हैदराबादच्या मैदानात जॉस बटलरचं (Jos Buttler) वादळ आल्याचं पहायला मिळालं. बटलरने वादळी खेळी करत फक्त 22 चेंडूत 54 धावांची धुंवाधार खेळी केली. यात 3 सिक्स तर 7 फोरचा समावेश आहे. या सामन्यात बटलरने जरी मैदान मारलं असलं तरी चर्चा मात्र होतीये जम्मू एक्सप्रेस उमरान मलिक (Umran Malik) याची..

सामन्यात प्रथम टॉस जिंकत कॅप्टन भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वरच्या निर्णयाला राजस्थानच्या सलामीवीरांना फेल ठरवलं. जॉस बटलरचं (Jos Buttler) आणि जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आक्रमक सुरूवात केली. बटलरने 20 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर फारूकीने (Fazalhaq Farooqi) बटलरला तंबुत पाठवलं. त्यानंतर कॅप्टन संजूने (Sanju Samson) कमान हातात घेतली. त्याने चार सिक्स मारत 55 धावा केल्या. त्यानंतर हेटमायरने अखेरीस 22 धावा केल्यात.

जयस्वाल (Yashasvi Jaiswal) 54 धाव करून बाद झाल्यावर राजस्थानचा नव्या दमाचा खेळाडू देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) मैदानात आला. त्यावेळी त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. लेफ्ट हॅडर खेळाडूला पाहून भुवीने उमरानला पुन्हा बोलवलं. त्यावेळी उमरानने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर पेडिकल्लला (Devdutt Padikkal Wicket) काही कळण्याच्या आत मैदानाबाहेर पाठवलं. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

पाहा VIDEO -

दरम्यान, पहिल्या डावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 204 रन्स ठोकले आहेत, सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 204 रन्स करावे लागणार आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार हैदराबादने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले आहेत.

हैदराबादचा संघ

मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (WC), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (C), उमरान मलिक, टी नटराजन, फजलहक फारुकी.

राजस्थान रॉयल्सचा संघ

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल