ICC ODI WC 2023: यंदाच्या वर्षी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप (ICC ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर- नोब्हेंबर महिन्यामध्ये भारतात वर्ल्डकपचं आयोजन केलं जाणार आहे. प्रत्येक भारतीय चाहत्याचं स्वप्न आहे की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) यंदाचा वर्ल्डकप उचलावा. अशातच रोहित शर्माने एक मोठं विधान केलंय, ज्यामुळे सर्व भारतीय चाहते, फार खूश झालेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी फार खूश असल्याचं दिसून येतं. तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी रोहित शर्माच्या एका विधानाने चाहत्यांना मात्र खुश केलं आहे.
वर्ल्डकपविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, वर्ल्डकप हा खूप स्पेशल असणार आहे. वर्ल्डकपची ती चमकणारी ट्रॉफी उचलण्यासाठी मी सर्वकाही करायला तयार आहे, जे माझ्याकडून शक्य आहे.
भारतात वनडे विश्वचषक आयोजित करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही भारतात 1987, 1996 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी भारत सह-यजमान असून भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे देश देखील आयोजक होते.
मात्र यंदाच्या वर्ल्डकपच्या इतिहासात 2023 (ICC ODI WC 2023) हा असा वर्ल्डकप आहे, जिथे केवळ भारत हा एकटा देश आहे, ज्याकडे आयोजनाची एकमेव जबाबदारी आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 साली वेस्ट इंडिजच्या टीमला नमवत वर्ल्डकपवर पहिल्यांदा नाव कोरलं होतं. यानंतर भारताला दुसरा वर्ल्डकप जिंकण्यासाठी 28 वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे यंदा रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकून इतिहास रचू शकतो.
वर्ल्डकपची तारीख समोर
वनडे वर्ल्डकप 2023 यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलेलं आहे. क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. यामुळे भारतीय चाहते देखील खूश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. त्याचसोबत फायनल सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.