सुनील गावस्करांच्या सपोर्टमध्ये बोलले फारूख इंजिनिअर

अनुष्का शर्मावर बोलले होते गावस्कर 

Updated: Sep 27, 2020, 06:38 PM IST
सुनील गावस्करांच्या सपोर्टमध्ये बोलले फारूख इंजिनिअर  title=

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपट्टू फलंदाज फारूख इंजिनिअर माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. सुनील गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या फॉर्मवर चर्चा करताना त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माचं नाव घेतलं होतं. यामुळे सोशल मीडियावरून भरपूर टीका देखील झाली. 

अनुष्का शर्माने देखील एक पोस्ट करून गावस्करांना काही प्रश्न विचारले होते. फारुख इंजिनिअर यांनी पाकिस्तानी ऑब्जर्बरशी बोलताना म्हटलं की,'आम्हा भारतीयांमध्ये सेंस ऑफ ह्यूमरची कमतरता आहे.'

फारूख इंजिनिअर म्हणाले की,'जर सुनीलने विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दल काही म्हटलं असेल तर ते मस्करीत असेल.' पुढे ते म्हणाले मी गावस्करला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यांनी काही म्हटलं असेल तर ते अतिशय मस्करीच्या मूडमध्ये म्हटलं असेल. 

इंजिनिअर म्हणाले की,'माझ्याबाबतीतही लोकांनी असंच गांभीर्याने घेतलं होतं. पण त्यानंतर अनुष्काने माहिती दिली होती.' इंजिनिअर देखील अशाच प्रकारे २०१९ च्या विश्व कप दरम्यान वादामुळे चर्चेत होते. 

इंजिनिअर यांनी म्हटलं होतं की, टीम इंडियाचे सेलेक्टर्स विराटची पत्नी अनुष्का शर्माला चाय चे कप देत आहेत. यानंतर अनुष्का शर्माने ट्विटरवर ट्विट करून आपल मत व्यक्त केलं होतं.