IND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...'

Cheteshwar Pujara Comeback : चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 14, 2024, 12:32 PM IST
IND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...' title=
IND vs ENG, Cheteshwar Pujara

Ranji Trophy 2024 : आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याच्यावर पराभवाचं खापर फोडण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र त्याला टीम इंडियामध्ये संधी दिली गेली नाही. ऑस्ट्रेलिया असो वा इंग्लंड दोन्ही वेळी सिलेक्टर्सने त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केलं नसल्याने अनेकांनी संताप देखील व्यक्त केला होता. अशातच चेतेश्वर पुजाराला बीसीसीआयकडून (BCCI) रेड अलर्ट देण्यात आलाय का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता खुद्द चेतेश्वर पुजाराने यावर भाष्य केलंय.

काय म्हणतो चेतेश्वर पुजारा?

मी मैदानात पूर्ण क्षमतेने खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी गेली 2 वर्ष मी मेहनत देखील घेतली आहे. जेव्हा जेव्हा भारतासाठी खेळण्याची संधी मिळेल तेव्हा मी आवश्यक असलेल्या उत्कटतेने आणि अभिमानाने खेळण्यास तयार असेल आणि ज्याने मी नेहमीच खेळलो आणि ते कधीही बदलणार नाही, असं चेतेश्वर पुजारा याने म्हटलं आहे.

चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराने झारखंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 243 धावांची नाबाद खेळी केली होती. पुजाराने हरियाणाविरुद्ध 49 आणि 43 धावा केल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी चेतेश्वर पुजाराला संघात घेतील, अशी शक्यता होती. मात्र, धमाकेदार खेळीनंतर देखील त्याला संघात स्थान मिळालं नाही.

दरम्यान, केएल राहुल जखमी झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सिलेक्टर्सने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. टीम इंडियामध्ये नसला तर चेतेश्वर पुजारा नामलौकिक मिळवतोय. राजकोट स्टेडियमच्या नाव बदण्याच्या सोहळ्यावेळी चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजा या दोन्ही खेळाडूंचा त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.