Shahid Afridi: पाकिस्तानी संघाची गेल्या काही काळापासून कामगिरी उत्तम नाही. याच कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट संघात काही बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन निवड समिती स्थापन केली होती. नव्याने स्थापन केलेल्या या समितीने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघात मोठे बदल केले आहेत. चला जाणून घेऊयात या बदलांबद्दल.
नव्याने स्थापित केलेल्या निवड समितीमध्ये माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद, माजी कर्णधार अझहर अली, माजी पंच अलीम दार, डेटा विश्लेषक हसन चीमा आणि सल्लागार बिलाल अफजल यांचा समावेश आहे. या बैठकीला कर्णधार आणि प्रशिक्षकही उपस्थित होते. सर्वांनी मिळून बाबर, नसीम आणि शाहीनला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, या तिन्ही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याचे निवड समितीने म्हटले आहे. याबद्दल आकिब जावेद म्हणतो की, खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, त्यांना संघातून वगळण्यात आलेले नाही.
दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदीचे सासरे आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपल्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. निवड समितीच्या या निर्णयाचे त्यांनी एक्स वर पोस्टिंग करून समर्थन केले. 47 वर्षीय आफ्रिदीचा असा विश्वास आहे की या हालचालीमुळे खेळाडूंची कारकीर्द लांबणीवर पडेल आणि पीसीबीला नवीन प्रतिभा तपासण्याची संधी मिळेल.
Supporting the selectors’ decision to give Babar, Shaheen, and Naseem a break from international cricket. This move not only helps protect and extend the careers of these champion players but also gives a great opportunity to test and groom emerging talent, building strong bench…
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) October 14, 2024
आफ्रिदीने सोशल मीडिया एक्सवर लिहिले की, "बाबर, शाहीन आणि नसीमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक देण्याच्या निवडकर्त्यांच्या निर्णयाचे मी समर्थन करतो. हे पाऊल या चॅम्पियन खेळाडूंच्या करिअरचे संरक्षण आणि विस्तार करण्यास मदत करेल. हे त्यांना सुधारण्याची उत्तम संधी देखील प्रदान करते. यामुळे भविष्यासाठी मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार होईल."
शाहिद आफ्रिदीने 14 अक्टूबर सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. त्याच्या या ट्विटला अनेकांनी लाईक केले आहे एवढंच नाही तर अनेकांनी ही पोस्ट रिपोस्टही केली आहे. या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली 'ते पाकिस्तान क्रिकेटचे रत्न आहेत जे लपविण्यास पात्र आहेत. ते फक्त झिम्बाब्वे आणि नेपाळविरुद्ध कामगिरी करू शकतात.' तर सूर्य युजरने कमेंट केली की ' तुमच्या जवताला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सांगा. गेल्या 7 वर्षांत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केवळ 3 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याच्याकडून सुधारण्याची अपेक्षा कशी आहे?'