बंगळूरू : बंगळूरूमध्ये उद्यापासून दुसरा टेस्ट सामना सुरु होणार आहे. पहिला टेस्ट सामना अवघ्या 3 दिवसांत जिंकल्यानंतर दुसऱ्या टेस्ट सामना जिंकून सिरीज काबीज करण्याकडे रोहित शर्माचं लक्ष असणार आहे. यासाठी कदाचित c
पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा ओपनिंगसाठी मयांक अग्रवालसोबत उतरला होता. मात्र यावेळी त्यामध्ये बदल करून दुसऱ्या टेस्टसाठी तो शुभमन गिलसोबत ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. केएल राहुल दुखापतीमुळे श्रीलंकेच्या सिरीजमधून बाहेर आहे.
पहिल्या टेस्ट सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर हनुमा विहारी तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली उतरले होते. यामध्ये शक्यतो बदल केला जाणार नाही. त्याचप्रमाणे पाचव्या नंबरवरही ऋषभ पंतच उतरणार आहे.
पहिल्या सामन्यात जयवंत यादवला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला दोन्ही डावात एकंही विकेट मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या जागी स्पिनर अक्षर पटेलला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.