टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हॉईट वॉश, 3-0 ने जिंकली सीरीज

दक्षिण आफ्रिकेवर एक इनिंग आणि २०२ रन्सनं मोठा विजय

Updated: Oct 22, 2019, 10:55 AM IST
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हॉईट वॉश, 3-0 ने जिंकली सीरीज

मुंबई : टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला टेस्ट सीरिजमध्ये व्हॉईट वॉश दिला आहे. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर एक इनिंग आणि २०२ रन्सनं मोठा विजय साकारत टेस्ट सीरीज ३-० नं जिंकली. रांची टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी केवळ दोन विकेट्सची गरज होती. भारताकडून प्रथमच टेस्ट खेळत असलेल्या शाहबाज नदीमनं अखेरच्या दोन विकेट्स घेत भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संपूर्ण सीरिजमध्ये टीम इंडियाचंच वर्चस्व पाहायला मिळालं. विराट कोहली, रोहित शर्मा आणि मयांक अगरवालनं या सीरिजमध्ये डबल सेंच्युरी झळकावली. तर अखेरच्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेनं सेंच्युरी झळकावली. रोहितनं सीरीजमध्ये सर्वाधिक ५२९ रन्स केल्या. भारतानं प्रथमच दक्षिण आफ्रिकेला टेस्टमध्ये क्लीन स्वीप दिला. तर मायभूमीत सलग सहा टेस्ट टीम इंडियानं जिंकल्या आहेत. 

दोन टेस्टमध्ये इनिंगनं विजय मिळवण्याची किमया कोहली एँड कंपनीनं केली. तर कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मायभूमीत तीनवेळा प्रतिस्पर्ध्यांना व्हॉईट वॉश देण्याची किमया साधली आहे.