Praggnanandhaa Vs Carlsen : नॉर्वेचा कार्लसन या जगातील नंबर वन खेळाडूला टक्कर दिली ती एक 18 वर्षाचा भारतीय मुलाने... बुद्धीबळाचा वर्ल्ड वर्ल्ड चॅम्पियन कोण? असा सवाल गेल्या दोन दिवसापासून विचारला जातोय. त्याचं उत्तर आता मिळालंय. नॉर्वेचा कार्लसनने आता भारताच्या प्रज्ञाननंदचा पराभव केला. मात्र, 18 वर्षाच्या प्रज्ञानंदने प्रत्येक भारतीयाची मन जिंकली आहेत. गेल्या दोन दिवसापासून सर्वांची उत्सुकता वाढवलेला प्रज्ञाननंद आहे तरी कोण? असा सवाल आता विचारला जात आहे.
प्रज्ञाननंद जागतिक बुद्धिबळ फायनलमध्ये पोहोचणारा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर दुसरा भारताचा खेळाडू बनला आहे. प्रग्गु असं प्रज्ञानंदचं टोपणनाव. 2018 मध्ये 12 वर्षांच्या वयात अनेक पराक्रम गाजवल्यानंतर प्रज्ञाननंद हा सर्वात तरुण भारतीय ग्रँड मास्टर आहे. प्रज्ञाननंद यांचा जन्म चेन्नईमध्ये 10 ऑगस्ट 2005 रोजी झाला. रमेशबाबू आणि नागलक्ष्मी यांच्या पोटी जन्मलेल्या प्रज्ञाननंदला जन्मापासून बुद्धबळाची आवड होती. त्याची मोठी बहीण वैशाली देखील बुद्धिबळपटू आहे आणि दोनदा युवा चॅम्पियन देखील राहिलीये. त्यामुळे घरात नेहमी चेसविषयी उत्सुकतेचं वातावरण राहिलं.
आपल्या बहिणीला खेळताना पाहून प्रज्ञाननंदचा या खेळात रस निर्माण झाला. 2013 मध्ये जेव्हा त्याने वयाच्या 7 व्या वर्षी अंडर-8 वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप जिंकली, तेव्हा त्याचं सर्वत्र कौतूक झालं. हे त्याच्या आयुष्यात मिळालेलं पहिलं यश होतं. या विजयामुळे त्याला FIDE मास्टर ही पदवी देखील मिळाली. प्रज्ञाननंदने त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. त्याने 2015 मध्ये अंडर-10 गटात पुन्हा विजेतेपद पटकावलं.
Magnus Carlson vs R Praggnanandhaa's second game ends in a draw, Carlson wins the 2023 FIDE World Cup pic.twitter.com/av43eqIX3E
— ANI (@ANI) August 24, 2023
यश मिळत असताना 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय दर्जावर कामगिरी गाजवली. तो 10 वर्षे 10 महिने आणि 19 दिवसांचा असताना सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर झाला. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच 2017 मध्ये त्याने जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत पहिला ग्रँडमास्टर नॉर्म जिंकला. त्यानंतर राज्यभर त्याची चर्चा झाली. विश्वनाथन आनंदने देखील त्याचं अभिनंदन केलं होतं. तसेच 2018 साली इटलीतील ग्रेडाइन ओपनमध्ये प्रज्ञानंदने आणखी एक पराक्रम गाजवला. लुको मोरोनीचा पराभव करून उल्लेखनीय कामगिरी केली.
दरम्यान,हळूहळू तो यशाची पायरी चढत असताना त्याने 2022 मध्ये यशाची उच्च पातळी गाठली. विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करून त्याने भारतीयांची मान गर्वाने उंचावली होती. विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णानंतर कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बनला. त्यानंतर आता तो वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.