Who is Sai Sudharsan: मैदानात तरी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असला तरी पड्यामागे डोकं लावतोय तो कोच आशिष नेहरा (Ashish Nehra). नेहरा महत्वाच्या सामन्यात गुजरातसाठी रणनिती आखण्याचं काम करतोय. अशातच आयपीएलच्या सुरूवातीपासून कॅप्टन हार्दिक पांड्याने हुकमी एक्का जपून ठेवला होता. आता प्लेऑफमध्ये हाच हिरा गुजरातचं नशिब चमकवतोय. त्याचं नाव साई सुदर्शन (Sai Sudharsan).
फायनलच्या सामन्यात गुजरातने तुफान फलंदाजी करत चेन्नईसमोर 215 धावांचं आव्हान उभं केलं आहे. चेन्नईने टॉस जिंकला खरा पण गुजरातच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत धोनीच्या बॉलर्सचा घाम फोडला. शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पावर प्लेमध्ये गुजरातने 62 धावा केल्या होत्या. मात्र, शुभमन गिल बाद झाल्यावर बाजू सांभाळली ती साई सुदर्शन याने. पठ्ठ्यानं कोणालाच सोडलं नाही.
आक्रमण सुरू ठेऊन साई सुदर्शनने 47 बॉलमध्ये 96 धावा केल्या. त्यात त्याने 8 फोर तर 6 गगनचुंबी षटकार खेचले. साई सुदर्शन याने यंदाच्या आयपीएलमध्ये 7 सामन्यात 266 धावा केल्या आहेत. त्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 62 धावांची संयमी खेळी केली होती. त्यानंतर हार्दिकने त्याला आराम दिला आणि महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा आपल्या हिऱ्याला उतरवलं.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फायनलमध्ये (CSK vs GT Final) साई सुदर्शन फलंदाजी करत असताना डिजिटल व्ह्यूअरशिप 2.9 कोटींवर पोहोचली होती. मात्र, हाच साई सुदर्शन आहे तरी कोण?
साई सुदर्शन (Sai Sudharsan) हा मुळचा तामिळनाडूचा. साई सुदर्शनचे वडील (Sai Sudharsan Father) आर भारद्वाज यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आई (Sai Sudharsan Mother) उषा भारद्वाज यांनी तामिळनाडूसाठी राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळली आहे.
ज्यावेळी साई पहिल्यांदा आयपीएल खेळणार होता, त्यावेळी नॉर्जिया हा घातक बॉलर समोर होता. तेव्हा आई टीव्ही बंद करून देवासमोर प्रार्थना करत होती. आपल्या मुलाने टीम इंडियासाठी खेळावं, अशी इच्छा देखील साईच्या आईने व्यक्त केली आहे.
96 off just 47 deliveries under tremendous pressure!
A spectacular knock from Sai Sudharsan comes to an end
Follow the match https://t.co/WsYLvLrRhp#TATAIPL | #Final | #CSKvGT | @sais_1509 pic.twitter.com/m2SLZ7SlH5
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
आयपीएलच्या अगदी आधी झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग लिलावात, लायका कोवई किंग्जने त्याला तब्बल 21.60 लाख रुपयांना विकत घेतल्यानंतर सुदर्शन हा स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. गुजरात टायटन्सने त्याला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतलेल्या कमाईपेक्षा हा आकडा अधिक आहे. यासोबत साई सुदर्शन विजय हजारे ट्रॉफी आणि मुश्ताक अली ट्रॉफी सुद्धा खेळ आहे.