खुलासा! पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज

कोणी सुरुवात केली सचिन-सचिनच्या आवाजाची

शैलेश मुसळे | Updated: Apr 24, 2018, 12:09 PM IST
खुलासा! पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज title=

मुंबई : 'सचिन-सचिन'चा आवाज जगभरात क्रिकेट प्रेमींनी अनुभवला आहे. पण दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेच याचा खुलासा केला आहे. सचिनने म्हटलं की, मी कधी विचार देखील केला नव्हता की क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर देखील सचिन-सचिनचा आवाज मैदानावर येतो. आता हा आवाज सिनेमागृहापर्यंत पोहोचला आहे. मला याचा खूप आनंद आहे.' 

कोण आहे ती व्यक्ती?

सचिनने त्याच्या जीवनावर आधारित बनलेल्या 'सचिन ए बिलियन ड्रिम्स' या सिनेमात याचा खुलासा केला आहे. सचिनला विचारण्यात आलं होतं की, सर्वात आधी 'सचिन-सचिन' केव्हा ऐकलं होतं. तेव्हा त्याने म्हटलं की, 'याची सुरुवात माझ्या आईने केली होती. मी खाली खेळण्यासाठी जायचो तेव्हा आई मला बोलवण्यासाठी सचिन-सचिन असा आवाज द्यायची.'

सचिनचा खुलासा

सचिनच्या चाहत्यांनी त्याच्या लहानपणीचे फोटो पाहिले असतील. ज्यामध्ये तो हातात बॅट घेऊन दिसत आहे. त्याने म्हटलं की, हा फोटो तेव्हा काढला जेव्हा मी माझ्या भावासोबत खेळत होतो. गॅलरीमध्ये हा फोटो काढला होता. मी तेव्हा 4 ते 5 वर्षांचा होतो. क्रिकेटची बॅट असो किंवा टेनिसचं रॅकेट, माझा भाऊ माझ्याकडे टेनिस बॉल फेकायचा आणि मी त्या बॉलला मारायचो.

पाहा व्हिडिओ