MS Dhoni: धोनीची 'शेवटची मॅच' ऋषभला आधीच माहिती होती, पुस्तकातून झाला खुलासा!

R Sridhar on MS Dhoni: आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात महेंद्रसिंग धोनी (Dhoni) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील संभाषणाचा उल्लेख केला आहे.

Updated: Jan 13, 2023, 05:24 PM IST
MS Dhoni: धोनीची 'शेवटची मॅच' ऋषभला आधीच माहिती होती, पुस्तकातून झाला खुलासा! title=
MS Dhoni

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) म्हणजे क्रिडाविश्वातील गाजलेलं नाव. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. असं असलं तरी धोनी आयपीएलचे (Dhoni IPL 2023)  सामने खेळतो. धोनीच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश रैनाने (Suresh Raina) देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. मात्र, सध्या टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आर श्रीधर यांनी 'कोचिंग बेयांड- माय डेज विद द इंडियन क्रिकेट टीम' या पुस्तकात (Coaching Beyond- My days with the Indian cricket team) मोठा खुलासा केला आहे.

आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील संभाषणाचा उल्लेख केला आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनच्या (IND vs NZ) राखीव दिवशी या दोघांमध्ये संभाषण झालं होतं. (ms dhoni rishabh pant conversation over msd retirement during 2019 world cup reveals r sridhar in book marathi news)

काय म्हणाले श्रीधर?

एक दिवस बीसीसीआयच्या (BCCI) मुलाखतीसाठी मी ऑनलाईन पद्धतीने सामील झालो होतो. सर्वांना माहिती होतं की धोनीने अखेरचा टीम इंडियासाठी अखेरचा सामना खेळलाय.अर्थात त्याने ते जाहीर केले नाही, पण मला याची खात्री होती, की धोनीचा नक्कीच अखेरचा सामना (MS Dhoni last Match) असणार आहे.

मँचेस्टर येथे न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलच्या (WC Semifinal) राखीव दिवशी सकाळी, मी ब्रेकफास्ट हॉलमध्ये पोहोचलेल्यांपैकी एक होतो. मी कॉफी घेत होतो जेव्हा एमएस आणि ऋषभ पंत आत आले आणि माझ्या टेबलावर बसले होते. त्यावेळी मला दोघांमधील बोलणं ऐकू आलं. 

आणखी वाचा - ind vs sl : दिवस प्रत्येकाचे येतात! जडेजाला आता वाटतेय भीती? मॅचनंतरचं ट्विट होतंय व्हायरल

भाऊ, आजच काही लोक लंडनला जाण्याचा विचार करत आहेत. तू येशील का?, असा प्रश्न ऋषभने (Rishabh Pant) विचारला होता. नाही, ऋषभ. मला संघासोबतची माझी शेवटची बस ड्राइव्ह चुकवायची नाही, असं धोनीने त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर ऋषभला देखील कळून चुकलं होतं की, धोनी आता रिटायर होतोय.

दरम्यान, सर्वांच्या मनात धोनीविषयी आदर होता, त्यामुळे मी रवी शास्त्री, अरूण किंवा माझ्या बायकोला देखील याविषयी सांगितलं नाही, असं श्रीधर (R Sridhar) त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात. सध्या आर श्रीधर यांचं कोचिंग बेयांड- माय डेज विद द इंडियन क्रिकेट टीम पुस्तक चर्चेत आहे. यातून अनेक खुलासे होताना दिसत आहेत.