Red Caps In Lord’s Ashes Test: सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात अॅशेस मालिकेचा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. 416 धावांचा आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं अन् धमाकेदार सुरूवात केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथने (Steven Smith) शतक ठोकत संघाला मजबुती दिली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कसा खेळ होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच दुसऱ्या दिवशी प्लेयर्स मैदानात उतरताच अनोखं दृष्य पहायला मिळालं. सर्व खेळाडू लाल कॅप (Red Caps) घातल मैदानात उतरले होते.
खेळाडूंनी हे पाऊल एका खास कारणासाठी उचललं होतं. खेळाडूंव्यतिरिक्त मैदानावरील प्रेक्षकांनाही या विशिष्ट सामन्यासाठी लाल रंगाचे कपडे घालण्यास प्रोत्साहित करण्यात आलं आहे. मात्र, यामागील नेमकं कारण काय? असा सवाल आता विचारला जातोय.
सामन्याचा दुसरा दिवस रुथ स्ट्रॉस फाउंडेशनला (Ruth Strauss Foundation) समर्पित केला गेलाय. रुथ स्ट्रॉस ही इंग्लंडचे माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसची (Andrew Strauss ) पत्नी होती, तिचं 2018 मध्ये धूम्रपान न करणाऱ्यांना होणाऱ्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. रुथला या भयंकर आजाराने ग्रस्त असलेल्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती. हे फाउंडेशन अँड्र्यूने त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ स्थापित केलं होतं. त्याला इंग्लंडने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात 1,204,447 युरोचा निधी जमा झाला, जो एक विक्रम आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केवळ रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनला पाठिंबा देण्यासाठी लाल टोपी घातली. या दिवसाला ‘रेड फॉर रुथ’ असे (Red For Ruth) म्हणतात. सामन्यावेळी समालोचक देखील लाल कोटमध्ये दिसले.
A standing ovation for Sir Andrew Strauss as he makes his way around the boundary on #RedForRuth Day at Lord's pic.twitter.com/DUVdrvbQ9f
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 29, 2023
दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला होता. ऑस्ट्रेलियाने पहिला डावात 416 धावा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर गारद झाला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 58 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवस सामन्याच्या दृष्टीने निर्णायक राहण्याची शक्यता आहे.