MI vs GT: पराभवानंतर डग-आऊटमध्ये का संतापलेला रोहित शर्मा? Video Viral झाल्याने खळबळ

IPL 2024 MI vs GT, Rohit Sharma:  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 

Updated: Mar 27, 2024, 12:05 PM IST
MI vs GT: पराभवानंतर डग-आऊटमध्ये का संतापलेला रोहित शर्मा? Video Viral झाल्याने खळबळ title=

IPL 2024 MI vs GT, Rohit Sharma Video: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 17 व्या सिझनमध्ये मैदानात उतरणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव स्विकारावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात हार्दिक आणि रोहित शर्मा यांच्याकडे पाहून दोघांमध्ये काही ठीक नसल्याचं दिसून आलं. हार्दिकने रोहितला फिल्डींगला अनेक ठिकाणी धावायला लावलं तर सामन्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा डग आऊटमध्ये चांगलाच संतापलेला दिसला. नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान हार्दिकच्या कर्णधारपदाची आणि सहकारी खेळाडूंसोबतच्या वागणुकीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये रोहित शर्मा-जसप्रीत बुमराह गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये संतापलेले दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि स्पिनर गोलंदाज पियुष चावला डग आऊटमध्ये बसलेले दिसतायत. या व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराह रागावलेला दिसतोय. या शिवाय तो रोहित शर्मालाही तो तेच सांगत असून हिटमॅनही संतापलेला दिसतोय. दरम्यान या व्हिडीओ मुंबईच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल आहे का, असा सवाल चाहत्यांकडून करण्यात येतोय.

पहिल्या सामन्यात हार्दिककडून शर्माचा अपमान?

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले. मुंबईचा कर्णधार बनताच रोहित शर्माला चुकीची वागणूक देण्यास सुरुवात केली असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर सामन्यातील काही व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये हार्दिक मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डींगच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत पळवताना दिसत होता. हार्दिक पंड्याच्या सांगण्यावरून रोहित शर्माची सुरु असलेली ही धावपळ चाहत्यांना अजिबात आवडलेली नाही. यावेळी चाहते हार्दिकच्या या कृत्यावर चांगलेच संतापलेत.